Manipur Violence

मणिपूरमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून हिंसाचाराचा आगडोंब उसळत आहे. दोन समुदायांमध्ये सुरू झालेल्या या लढ्यात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मणिपूरच्या इंफाळ पश्चिम जिल्ह्यात रात्री 11.45 च्या सुमारास अज्ञात लोकांनी चिथावणी देत गोळीबार सुरू केला ज्यात लष्कराचा एक जवान जखमी झाला. इंफाळ पश्चिम जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाला. या अतिरेक्यांनी परिसरातील पाच घरांना आग लावली. (हेही वाचा - New RAW Chief: छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी रवी सिन्हा बनणार रॉ प्रमुख)

एका अधिकाऱ्याने सांगितले की, जवानाला लिमाखॉंग येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना लिमाखोंग (चिंगमांग) येथील कांटो सबल गावात घडली. या घटनेनंतर लष्कराच्या जवानांनी परिसरातील ग्रामस्थांची उपस्थिती लक्षात घेऊन मर्यादित गोळीबार केला. संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की, या भागात अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले असून संयुक्त कारवाई सुरू आहे.

अधिका-याने सांगितले की, थोड्या शांततेनंतर, कांटो सबल गावातून दुपारी 2.35 वाजता पुन्हा अप्रत्यक्ष गोळीबार सुरू झाला, जो दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू होता. मणिपूरमधील मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये एका महिन्याहून अधिक काळ सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारात 100 हून अधिक लोक मारले गेले आहेत. अफवा रोखण्यासाठी राज्य सरकारने 11 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केली होती आणि इंटरनेट सेवा प्रतिबंधित केली होती.