मणिपूर: विद्यार्थ्यांनी शिक्षा दिल्याच्या रागातून शाळा पेटवली
Manipur School (Photo Credits-ANI)

मणिपूर (Manipur) येथील एका शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षा दिल्याच्या रागाने चक्क शाळाच पेटवून लावल्याची घटना घडली आहे. तर आगीमध्ये शाळेतील सर्व कागदपत्रे जळून खाक झाली आहेत,

जोसेफ उच्च माध्यमिक शाळेच्या प्रशासनाकडून काही विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी 25 एप्रिलला शाळेला लाग लावल्याचा प्रकार घडला आहे. तर शाळेच्या मुख्यध्यापकांनी असे म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना दिलेली शिक्षा मान्य नसल्याच्या कारणाने हा प्रकार घडवून आणलेला आहे. या आगीत शाळेतील 10 खोल्या जळाल्या आहेत.

मंत्री लेतपाओ हाओकिप यांनी या प्रकरणी सामील असणाऱ्या विद्यार्थ्यांवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले आहे. तर शाळेच्या पुर्नबांधणीसाठी सरकारकडून मदत घेणार असल्याचे मुख्याध्यापकांनी म्हटले आहे.