भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी (Maneka Gandhi ) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'गाढविनीच्या दुधापासून (Donkey's Milk) बनवलेला साबण महिलांचे सौंदर्य (Women's Beauty) वाढवतो', असे मनेका गांधी सांगत असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. पण, दावा करण्यात येत आहे की, हा व्हिडिओ उत्तर प्रदेश राज्यातील सुलतानपूर येथील एका कार्यक्रमात जनतेला संबोधीत करताना मनेका गांधी (Maneka Gandhi On Donkey's Milk and Women's Beauty) बोलत आहेत. इजिप्तची राणी क्लिओपात्रा (Cleopatra) ही देखील गाढवाच्या दुधात अंघोळ करायची, असाही दावा मनेका गांधी या व्हिडिओत करताना दिसतात.
मेनेका गांधी व्हिडिओत बोलताना दिसतात की, क्रियोपात्रा ही अतिशय प्रसिद्ध आणि सौदर्यवान राणी होती. ती गाढवाच्या दुधाने आंघोळ करायची. दिल्लीत गाढवाच्या दुधाने बनवलेल्या साबणाची किंमत प्रत्येकी 500 रुपये आहे. असे असले तरी, आपण बकरीच्या दुधाने आणि गाढवीच्या दुधाने साबण का बनवू नये? असा सवालही मनेका गांधी यांनी केला आहे.
माजी केंद्रीय मंत्री पुढे म्हणाल्या, तुम्ही गाढव पाहून किती दिवस झाले? त्यांची संख्या कमी होत आहे. धोब्यांनीही गाढव वापरणे बंद केले आहे. लडाखमध्ये एक समुदाय आहे ज्याने गाढवांची संख्या कमी होत असल्याचेही लक्षात घेतले आहे. त्यांनी गाढवांचे दूध काढायला सुरुवात केली आणि दुधाचा वापर साबण बनवण्यासाठी केला. गाढवाच्या दुधाने बनवलेले साबण स्त्रीचे शरीर कायमचे सुंदर ठेवते.
सोशल मीडियावरील व्हिडिओत माजी मंत्री पुढे म्हणाल्या की, मला वाटते लोकांना प्राण्यांपासून पैसेच कमवायचे नाहीत. आजपर्यंत शेळ्या किंवा गायी पाळून कोणीही श्रीमंत झालेला नाही. आमच्याकडे तेवढे डॉक्टरही नाहीत. सुलतानपूरच्या 25 लाख लोकांमध्ये जनावरांचे कदाचित तीन डॉक्टर असतील. अनेक ठिकाणी तेही नसतात. (हेही वाचा, पत्नीचा त्याग करणे NRI लोकांना पडले महागात; सरकारने रद्द केले 45 पासपोर्ट)
व्हिडिओ
गधे के दूध का साबुन औरत के शरीर को खूबसूरत रखता है"इनकी सुंदरता की राज आजा के सामने आई जो गधे के दूध से बनी और गोबर से बनी साबुन का प्रोडक्ट यूज करती हैं
◆ BJP सांसद @Manekagandhibjp का बयान #BJP | BJP | #ManekaGandhi | Maneka Gandhi pic.twitter.com/rXW1aY1t6o
— AZAD ALAM (@Azad24906244) April 2, 2023
एखादी गाय, म्हैस किंवा शेळी पाळली आमि ती आजारी पडली, तर त्यांच्यावर लाखो रुपये खर्च केले जातात. महिलांनाही पशुधनासाठी मदत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. पण ते किती करू शकतात? त्यामुळे शेळी किंवा गाय पाळणाऱ्यांच्या विरोधात मी ठाम आहे. तुम्हाला कमवायला एक दशक लागेल. पण प्राणी एका रात्रीत मरेल आणि सर्व काही संपेल, असेही त्या म्हणाल्या.