उत्तर प्रदेशात बायकोने दारु पिण्यास नकार दिल्याने नवऱ्याने तिच्यावर गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
गुरुवारी रात्री बायकोने दिनेशला दारु पिण्यास नकार दिला. परंतु तरही नवऱ्याने तिच्याशी वाद घालत दारु पिण्याचा आग्रह धरुन ठेवला. या दोघांमधील वाद एवढा टोकाला गेला की त्याने त्याच्याजवळील बंदूकीने बायकोवर गोळ्या झाडल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी आरोपी त्याची बंदूक जप्त करण्यात आली आहे. परंतु आरोपीने हत्या केल्यानंतर घटनास्थळापासून पळ काढला आहे.