पत्नीच्या गुप्तांगाला दिले तापलेल्या चाकूचे चटके; अनैतिक संबंधाच्या संशयाने पतीचे क्रूर कृत्य
Man brands wife's private parts with knife | (Photo Credits- File photo for representation only)

केवळ संशयावरुन सुरु झालेली पती पत्नीचे भांडण एका भयावह आणि क्रूर कृत्यापर्यंत जाऊन पोहोचले. हे कृत्य इतके भयावह आहे की, कोणत्याही संवेदनशिल व्यक्तीच्या मनाचा थरकाप होईल. एका पतीने रागाच्या भरात चक्क आपल्या पत्नीचे गुप्तांग (Genitalia) चाकूने डागले आहे. ही घटना अहमदाबाद (Ahmedabad) येथील रायखंड परिसरात शुक्रवारी (22 फेब्रुवारी 2019) घडली. आरोपी (वय 45 वर्षे) पतीला संशय होता की, त्याच्या पत्नीचे त्याच्या मित्रासोबत अनैतिक संबंध आहेत.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी पतीने आपल्या पत्नीचे मित्रासोबत फोनवरील बोलतानाचे रेकॉर्डिंग ऐकले. त्यानंतर आरोपीने आपल्या पत्नीवर आरोप केला की, मित्रासोबत तिचे अनैतिक संबंध आहेत. मित्रासोबत असलेल्या अनैतिक संबंधाबाबत पतीने केलेल्या आरोपाचे पत्नीने खंडण केले. पत्नीचे उत्तर ऐकूण पती चिडला त्याने पत्नीला पठ्ठ्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने तिला इतके बेदम मारले की, ती जागेवरच बेशुद्ध झाली. तिला प्रचंड मारहाण करुनही पतीचे मन शांत झाले नाही. पत्नी बेशुद्ध असताना पतीने घरातील चाकू विस्तवावर तापवला. तापवलेल्या चाकूने पतीने बेशुद्धावस्थेत असलेल्या पत्नीच्या गुप्तांगावर डागले (चटके दिले).

दुसऱ्या दिवशी (शनिवार, 23 फेब्रुवारी 2019) याच मुद्द्यावरुन पती, पत्नींमध्ये पुन्हा एकदा भांडण सुरु झाले. या भांडणात पतीने पुन्हा एकदा पत्नीला बेदम मारहाण केली. विकृत पतीने पुन्हा एकदा तापवलेल्या चाकूचे पत्नीच्या गुप्तांगावर डाग दिले. त्यानंतर रविवारी (24 फेब्रुवारी 2019) पती एका नातेवाईकाच्या विवाहाला उपस्थित राहण्यासाठी गेला. ही संधी साधून पीडित पत्नीने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती नातेवाईकांना दिली. पीडितेने दिलेली माहिती ऐकून नातेवाईकांना धक्का बसला. (हेही वाचा, वहिणीच्या प्रेमात दीर फसला, तिला बायको करण्याच्या हट्टापाई आयुष्यातून उटला)

नातेवाईकांनी पीडित पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात तातडीने दाखल केले. वैद्यकीय तपासणी केल्यावर डॉक्टरांनी सांगितले की, पीडितेच्या गुंप्तांगाला आणि अंतर्गत भागातही मोठ्या जखमा झाल्या आहेत. गेइकवाड हवेली पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल झाली असून, पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पीडितेला दोन अपत्येही आहेत.