Mallikarjun Kharge (Photo Credit - PTI)

काँग्रेस (Congress) अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. शशि थरुर (Shashi Tharoor), पवन बन्सल, दिग्विजय सिंह यांची नावे चर्चेत असतानाच काँग्रेस नेते मल्लिकार्जून खडगे (Mallikarjun Kharge) यांचेही नाव या चर्चेत आले आहे. खडगे यांनी आपल्या राज्यसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर खडगे हे काँग्रेस अध्यक्ष पदाच्या स्पर्धेत असल्याची जोरदार चर्चा आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्यापूर्वी पक्षाच्या 'एक व्यक्ती, एक पद' या नियमाचे पालन करत त्यांनी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी राजीनामा दिला. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबर रोजी निवडणूक पार पडत आहे. मल्लीकार्जून खडगे हे सध्या 80 वर्षांचे आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे शशि थरुर यांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते. 80 वर्षांच्या खडगे यांना आपण थरुर यांना पाठीमागे टाकू शकतो असा विश्वास आहे. (हेही वाचा, Congress President Election: कॉंग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणूकीतून Digvijaya Singh यांची माघार; Mallikarjun Kharge यांना पाठिंबा देणार)

दरम्यान, खडगे यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आल्यापासून त्यापदासाठी अनेक नावे समोर आली आहेत. इतर नावे चर्चेत असली तरी विरोधी पक्षनेते म्हणून पी चिदंबरम किंवा दिग्विजय सिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विद्यमान माहितीनुसार सध्यास्थितीत काग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतल शशि थरुर, झारखंडचे केएन त्रिपाटी हे दोन उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, मल्लिकार्जून खडगे हे जर रिंगणात उतरले तर खरी लढत ही शशि थरुर आणि खडगे यांच्यातच होणार आहे. के एन त्रिपाटी यांना या निवडणुकीत फारसे गृहित धरले जाताना दिसत नाही.