Mahavir Jayanti 2019 (Photo Credits: File Photo)

जैन धर्माच्या 24 तीर्थंकारांपैकी शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांचा आज जन्मदिवस. म्हणजे महावीर जयंती. जैन धर्मियांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. या दिवशी अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र यंदा भारत देश कोरोना व्हायरसच्या सावटाखाली असल्याने सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान या शुभदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह अनेक दिग्गज नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, पियुष गोयल, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशवासियांना महावीर जयंती निमित्त ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. (महावीर जयंतीच्या शुभेच्छा देताना मराठी Messages, Greetings, Whatsapp Status, Facebook Images शेअर करून जैन बांधवांचा दिवस करा खास)

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट:

 

रेल्वेमंत्री पियुष गोयल ट्विट:

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ट्विट:

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ ट्विट:

काँग्रेस नेते राहुल गांधी ट्विट:

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी:

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर:

सत्य, अहिंसा, ब्रम्हचर्य, अपरिग्रह आणि क्षमा यांचा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांची जयंतीचे पर्व    जैन धर्मातील लोक 'महापर्व' म्हणून मानतात. या दिवशी जैन मंदिरात महावीरांच्या मूर्तीला अभिषेक केला जातो. त्यानंतर साग्रसंगीत पूजा करुन मूर्ती रथात बसवली जाते आणि शोभायात्रा काढली जाते. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने भक्त सहभागी होतात. तर काही ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन गरीब व गरजूंना मदत केली जाते.