महात्मा गांधी हे भारतरत्न पेक्षा श्रेष्ठ; सर्वोच्च न्यायालयाचे  मोठे विधान
Mahatma Gandhi (Photo Credits: pixaBay)

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)  दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेत महात्मा गांधी (Mahatma Gandhi)  यांना भारतरत्न (Bharatratna) देण्याची मागणी करण्यात आली होती मात्र ही मागणी फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला (Union Government) याबाबत कोणताही आदेश दिलेला नाही, हा निर्णय देत असताना महात्मा गांधी हे स्वतः भारतरत्ना पेक्षा श्रेष्ठ आहेत असे सर्वोच्च न्यायालयाचे विधान लक्षवेधी ठरले. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात गांधींची ख्याती ज्ञात आहे, तसेच आम्ही याचिका कर्त्यांच्या भावनेचा सन्मान करतो मात्र महात्मा गांधींसाठी भारतरत्नाची आवश्यकता नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र तरीही समाधान न झाल्यास याचिकाकर्ते थेट केंद्र सरकारकडे याबाबत मागणीचा अर्ज करू शकतात असेही कोर्टाने सांगितले आहे.

आजवर अनेकांना भारत रत्न देऊन सन्मानित करण्यात आले आहे, काहींना तर मरणोत्तरही हा पुरस्कार मिळाला आहे, त्यानुसार महात्मा गांधी हे या पुरस्काराचे मानकरी असायला हवे असे म्हणत ही जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र हा निर्णय सरकारचा असून हा मुदा न्यायालयीन अधिकार कक्षेच्या बाहेर आहे असा निर्णय कोर्टातर्फे देण्यात आले आहे.

ANI ट्विट

दरम्यान, यापूर्वी काँग्रेसने देखील भाजपाला जर का स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भारतरत्नासाठी तुम्ही इतके आग्रही आहेत तर हाच पुरस्कार गांधींना का नाही असा सवाल केला होता,ज्यावर केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी उत्तर देत "काही नेते कोणत्याही पुरस्काराहून श्रेष्ठ असतात. महात्मा गांधीदेखील मोठे नेते असल्याने त्यांचा या पुरस्कारासाठी विचार झाला नाही. इतकेच नव्हे तर प्रत्यक्षात शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी महात्मा गांधी सर्वांत योग्य नेते होते, असेही रविशंकर प्रसाद म्हणाले होते.