Rain | representative pic- (photo credit -pixabay)

राज्यात सध्या मुसळधार पावसामुळे  (Heavy Rain) राज्यातील नागरिकांना मोठा त्रास हा सहन करावा लागत आहे. अनेक भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच अतिवृष्टी आणि पुरामुळं (Floods) शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. कोकणासह (Konkan) विदर्भातील (Vidharbha) काही जिल्ह्यातील नागरिकांना या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  आज सकाळपासूनही मुंबईत आणि परिसरात सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून कामावर जाणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठा त्रास हा सहन करावा लागत आहे. (हेही वाचा - Mumbai Andheri Landslide: मुंबईतील अंधेरी परिसरात इमारतीवर दरड कोसळली, कोणतेही जीवितहानी नाही)

आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडं संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

लातूर- जहिराबाद महामार्गावरील शेजारील कर्नाटक हद्दीतील जामखंडी येथील पर्यायी पूल वाहून गेला. त्यासोबतच औराद शहाजनी परिसरातील तगरखेडा, हालसी, सावरी, बोरसुरी गावांतील ओढ्याच्या पुलावर पाणी आल्याने या भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले झाले होते. औराद शहाजानी ,तगरखेडा, हालसी, सावरी, बोरसुरी या भागातील नागरिकांनी शेतकरी हे वाहतूक बंद असल्याने अडकून पडले होते.