पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विखे पाटील (Vikhe Patil) यांच्या परिवाराची बुधवारी भेट घेतली. तसेच कोविडच्या काळातील त्यांचे अहमदनगर मधील कामाचे ही कौतुक नरेंद्र मोदी यांनी केले. त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील, त्यांचे सुपुत्र खासदार सुजय विखे पाटील, सून धनश्री पाटील आणि 10 वर्षाची नात अनिशा पाटील यांनी मोदी यांची भेट घेतली. भेट झाल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतचा फोटो ट्विट केला आहे.
काही रिपोर्ट्समधून असे बोलले जात आहे की, 10 वर्षाच्या अनिशा हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ईमेल पाठवत त्यांच्या भेटीची वेळ मागितली होती. असे ही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले, अनिशा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्दे जसे शिक्षण, क्रिडा आणि आवड यावर 10 मिनिटे चर्चा केली.(Pushkar Singh Dhami Meets Nitin Gadkari: नवीन राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्र सरकारकडून मिळणार 1000 कोटी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी 'या' राज्याला दिले आश्वासन)
Tweet:
याप्रसंगी आमदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील आणि माझी पत्नी धनश्री देखील उपस्थित होते.
— Dr. Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe) August 11, 2021
परंतु अनिशा आणि मोदी यांचा ईमेल हा माजी आयटी प्रमुख आणि आम आदमी पार्टीचे अंकित लाल यांनी फेक न्यूज असल्याचे म्हटले आहे. खासदार सुजय विखे हे नरेंद्र मोदी यांना आज दिल्लीत भेटले. परंतु त्यांच्या मुलीने ईमेल पाठवला आहे तो खोटा आहे.