Maharashtra Board SSC Exams 2022: दहावीच्या विद्यार्थ्यांना 18 फेब्रुवारी पासून उपलब्ध होणार mahahsscboard.in वर हॉल तिकीट्स!
online ((Photo Credits: Pexels)

बारावी (HSC) पाठोपाठ आता महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या (SSC) विद्यार्थ्यांनाही त्यांची हॉलतिकीट्स (Hall Tickets) 18 फेब्रुवारी पासून उपलब्ध करून दिली जाणार आहेत. नुकतीच याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट www.mahahsscboard.in वरून लॉग इन मध्ये ही हॉल तिकीट्स डाऊनलोडसाठी उपलब्ध असणार आहेत. शाळा या हॉलतिकीट्सना डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहेत. नक्की वाचा: Maharashtra Board Class 12 Hall Tickets: बारावीच्या विद्यार्थ्यांची हॉलतिकीट्स आज दुपारी 1 वाजल्यापासून mahahsscboard.in वर होणार उपलब्ध! 

कोविड च्या दहशतीखाली मात्र तरीही ऑफलाईन पद्धतीनेच यंदा देखील बोर्डाच्या परीक्षा पार पडणार आहेत. 15 मार्चपासून राज्यात दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. 18 फेब्रुवारीला दुपारी 1 नंतर ही हॉलतिकीट्स ऑनलाईन उपलब्ध करून दिली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना ही हॉलतिकीट्स शाळेकडून घेताना कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही.

बोर्डाच्या सूचनांप्रमाणे हॉल तिकीट वर फोटो, सही, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख यामध्ये चूक/दुरूस्ती असल्यास शाळेच्या स्तरावरच त्यामध्ये बदल करून एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे. तर हॉलतिकीट विद्यार्थ्यांकडून हरवल्यास शाळा ते रिप्रिंट करून त्यावर लाल पेनाने Duplicate असे लिहून विद्यार्थ्यांना पुन्हा देऊ शकते.

दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी प्रॅक्टिकल्स 25 फेब्रुवारी ते 14 मार्च 2022 या कालावधीत होणार आहे. लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये होणार आहेत.