छत्तीसगड मध्ये चर्चित महादेव सट्टा अॅप केस मध्ये अजून एक चकीत करणारा खुलासा समोर अअला आहे. सट्टा केस मध्ये कारवाई करताना पोलिसांनी तपकरा भागामध्ये वडील आणि मुलासह चार आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी बॅंक अकाऊंट मधून पैशांचे ट्रान्झॅक्शन केल्याची माहिती मिळाली आहे. 95 संदिग्ध बॅंक अकाऊंट मधून 28 कोटी 76 लाखांचे ट्रान्झॅक्शन झाले आहे. एव्हढेच नव्हे तर 25 करोड 51 लाख रूपये बॅंक खात्यातून काढले आहेत. बॅंक मध्ये आताही 3 कोटी 24 लाख आहेत. पोलिसांनी हे बॅंक खातं फ्रीझ केले आहे. आरोपींकडून 2 लाख 30 हजार रूपये ताब्यात घेतले आहेत. यासोबतच 95 बॅंक खात्याची एटीएम कार्ड्स, पासबूक आणि चेकबूक जशपूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
काही दिवसांपूर्वी रायपूर पोलिसांनी छत्तीसगड मधील चर्चित महादेव सट्टा अॅप प्रकरणामध्ये मोठी कारवाई केली आहे. आरोपींनी बहाणी करत बँक खाती उघडली त्यानंतर या खात्यातून लाखो, करोडो रुपयांचे व्यवहार झाले. या प्रकरणातील तक्रारीनंतर रायपूर पोलिसांनी कारवाई करत महाराष्ट्रातील पुणे शहरातून महादेव रेड्डी अण्णा-15 पॅनेल चालवणाऱ्या 5 आरोपींना अटक केली. वास्तविक, पीडित दशरथ निषाद याने आपला मित्र मोहित विश्वकर्मा याच्या सांगण्यावरून बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते उघडल्याची तक्रार मौधपारा पोलिस ठाण्यात दिली होती.
पीडितेने सांगितले की, मित्राने आधार कार्डद्वारे खरेदी केलेले सिम बँक खात्यात नोंदवले आणि बँकेचे पासबुक, चेकबुक आणि एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवले. यानंतर एक दिवस आरोपी मोहित विश्वकर्मा याने फोन करून बँक खाते बंद करण्यास सांगितले. या प्रकरणाची माहिती संशयास्पद झाल्यावर मोहित विश्वकर्मा याने त्याच्या अन्य साथीदारांसह बँक खाते व मोबाईल क्रमांकाचा वापर करून महादेव सट्टा चालविल्याचे निष्पन्न झाले. Satta Matka Content Appear on Official State Government Websites: सट्टा, मटका प्रचरासाठी सरकारी संकेतस्थळांचा वापर? वेबसाईट्स हॅक झाल्याचा संशय, पेजवर आढळला सट्टेबाजी संबंधीत मजकूर (See Screen Shot) .
पीडितेने सांगितले की, मित्राने आधार कार्डद्वारे खरेदी केलेले सिम बँक खात्यात नोंदवले आणि बँकेचे पासबुक, चेकबुक आणि एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवले. यानंतर एक दिवस आरोपी मोहित विश्वकर्मा याने फोन करून बँक खाते बंद करण्यास सांगितले. या प्रकरणाची माहिती संशयास्पद झाल्यावर मोहित विश्वकर्मा याने त्याच्या अन्य साथीदारांसह बँक खाते व मोबाईल क्रमांकाचा वापर करून महादेव सट्टा चालविल्याचे निष्पन्न झाले.