Madhya Pradesh: पत्नीने घटस्फोटासाठी मागितले 1 कोटी, व्हिडिओच्या माध्यमातून दु:ख सांगत नवऱ्याने केली आत्महत्या
Death (Photo Credits-Facebook)

Madhya Pradesh:  मध्य प्रदेशातील खरगोन येथे 40 फूट उंच असलेल्या नर्मदा पुलावरुन उडी मारलेल्या तरुणाचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली. परंतु पोलिसांना त्याच्या जवळ एक सुसाइट नोट सुद्धा मिळाली. मृत्यूपूर्वी तरुणाने स्वत:चा एक व्हिडिओ तयार केला आणि घटस्फोटासाठी पत्नीसह सासरची मंडळी एक कोटी रुपयांची मागणी करत असल्याचे त्यात म्हटले. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.(Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशमध्ये 62 वर्षीय वृद्ध महिलेवर 75 वर्षीय व्यक्तीचा बलात्कार)

रीवा येथे राहणाऱ्या अजय द्विवेदी हा इंदौर येथून आपल्या मित्रासोबत ओमकारेश्वर ठिकाणी जात होता. याच दरम्यान, नर्मदा पुलावरुन त्याने उडी मारली. तीन दिवसांपासून गोताखोर सुनील केवट यांटी टीम तपास करत आहे. शनिवारी मुरल्ला नर्मदा नदीत एक तरंगत असलेला शव दिसल्यानंतर लोकांनी याबद्दल पोलिसांना सांगितले.

सुचना मिळाल्यानंतर मृत अजयच्या परिवारातील नातेवाईकांनी धाव घेतली. मृत तरुणाचे वडिल हे रीवा जिल्ह्यात सिरमौर मध्ये डिप्टी रेंजर आहे. त्यांनी आरोप लावला की, मुलाला सासरच्या मंडळींनी त्याचा छळ केला. यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्याला पैशांवरुन त्रास देत होते. याच कारणामुळे मुलाने आत्महत्या केली.

सुसाइड नोटमध्ये अजय याने असे म्हटले की, त्याच्या आत्महत्येसाठी गुरु प्रसाद तिवारी, प्रार्थना तिवारी, प्रिंस तिवारी आणि रमा तिवारी हे जबाबदार आहेत.  3 वर्षांपासून माझ्यासह परिवारावर केस करत एक कोटी रुपयांची मागणी करत होते. त्यामुळेच मी आत्महत्या केल्याचे अजय याने म्हटले.

तसेच अजय याने त्याच्या काकांवर सुद्धा केस केल्याचे व्हिडिओमध्ये सांगितले. त्यांचा माझ्या परिवारासोबत संबंध नसताना सुद्धा असे केले गेले. 3 वर्षांपासून केस सुरु असून एक कोटी रुपयांची मागणी केली जात होती. त्यांनी यासाठी खुप प्लॅनिंग केली होती. त्यांच्या या त्रासाला कंटाळूनच मी हा निर्णय घेतल्याचे अजय याने त्याच्या सुसाइड नोटमध्ये म्हटले.