मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील रीवा (Rewa District) जिल्ह्यातील मनगंवा (Mangawan in Rewa District) येथून एक खळबळजनक वृत्त आहे. येथील एका महिलेने आरोप केला आहे की, लॉकअपमध्ये असताना 5 पोलिसांनी तिच्यावर 10 दिवस सामूहिक बलात्कार केला. पीडितेने म्हटले आहे की, पोलिसांनी तिला 10 दिवसांपर्यंत लॉकअपमध्ये बंद करुन ठेवले. या ठिकाणी पोलिसांनी तिच्यावर बलात्कार केला. पीडिने आरोप केल आहे की, ज्या मनगंवा पोलीस स्टेशनमध्ये पीडिता लॉकअपमध्ये होती त्या पोलीस स्टेशनलेच प्रमुख प्रभारी आणि सब डिविजनल पोलीस ऑफीसर आणि इतर कर्मचाऱ्यांनी तिच्यावर बलात्कार केला.
प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी 9 मे 2020 मध्ये या महिलेला हत्येच्या आरोपाखाली अटक केले होते. या महिलेला 10 दिवसांपर्यंत मनगंवा पोलीस स्टेशनमध्ये लॉकअपमध्ये ठेवले. या वेळी तत्कालीन मनगवां पोलीस स्टेशन प्रमुख मृगेंद्र सिंह, एसडीओपी मनगवां बीएस बरिबा आणि इतर 3 पोलिसांनी तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने आरोप केला आहे की, ही घटना घडली त्या वेळी महिला उपनिरीक्षक सुप्रीया जैन यासुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या.
पीडितेने केलेल्या आरोपानंतर जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अरुण कुमार सिंह यांनी पत्र लिहून रीवा एसपी राकेश सिंह यांच्यासह पाच पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आणि चौकशीचे आदेश दिले आहेत. महिलेने 20 आणि 21 मे दरम्यान पोलिसांनी तिच्यावर अत्याचार केल्याच्या घटनेबाबत आरोप केला. (हेही वाचा, Rape Post Explaining Procedure Goes Viral: महिलेवर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार कसा करावा? हे सांगणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल; पोलीस तपास सुरु)
दरम्यान, महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी या घटनेला आक्षेप घेतला होता. परंतू वरिष्ठांनी दबाव टाकून महिला पोलीस कर्मचाऱ्यांना तेथून दूर जाण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांनी हे कृत्य केले.