Madhya Pradesh: कोर्टात धाव घेतल्याने संतापलेल्या नवऱ्याने घेतला बायकोच्या नाकाचा चावा
प्रतिकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

Madhya Pradesh:  नवरा बायकोमध्ये भांडण होणे ही गोष्ट सहाजिकच आहे. मात्र दोघांमधील वाद जर टोकाला गेल्यास त्याचे परिणाम वाईट होतात. अशाच पद्धतीची एक घटना मध्य प्रदेशातील रतलाम येथे घडली आहे. त्यानुसार एका नवऱ्याने आपल्या बायकोसोबत मारहाण केली. त्याचसोबत तिच्या नाकाचा चावा सुद्धा घेतला. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.(Uttar Pradesh Crime: यूपीमध्ये अनोखळी व्यक्तीशी बोलल्याबद्दल 35 वर्षीय महिलेला सासरच्या लोकांकडून झाडाला बांधून मारहाण)

खरंतर नवरा दारु पिऊन त्रास देतो यामुळे बायकोने घर सोडून कोर्टात त्याच्या विरोधात धाव घेतली होती. त्याचसोबत पोटगी सुद्धा मागितली होती. यामुळे नवरा संतप्त आणि नाराज झाला होता. प्रथम त्याने बायकोला मारहाण केली आणि नंतर तिच्या नाकाचा चावा घेतला. ही घटना एमपीच्या रतलाम जिल्ह्यातील आलोट कस्बे येथील आहे. जखमी झालेल्या बायकोला उपचारासाठी आलोट येथील रुग्णालयात दाखल केले आहे. महिला नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून घर सोडून गेली होती.

आलोट येथे राहणारी टीना माली हिचे लग्न उज्जेन जिल्ह्यातील झुठावद गावातील दिनेश माली याच्यासोबत 2008 मध्ये झाली होती. टीनाच्या मते दिनेश काहीच काम करत नव्हता. लग्नाच्या काही काळानंतर दिनेश दारु पिऊन तिला मारहाण करत असे. त्यामुळेच टीना हिने त्याच्या त्रासाला कंटाळून दोन मुलींना घेत घर सोडले.(Ghaziabad Serial Killer: एका पाठोपाठ कुटुंबातील 5 जणांना संपवले, 20 वर्षानंतर सिरिअल किलरचे बिंग फुटले; गाजियाबाद येथील खळबळजनक घटना)

तर 2019 मध्ये टीना हिने नवऱ्याच्या विरोधात कोर्टात धाव घेतली होती. मात्र दिनेश याने बायकोला कोर्टात दाखल केलेली केस मागे घेण्यासाठी दबाव टाकत होता. रविवारी दुपारी अंजुमन कॉलनीतील टीनाच्या घरी तो पोहचला आणि त्याने तिला तेथेच मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान त्याने आपल्या दाताने तिच्या नाकाचा चावा घेतला आणि तेथून पळून गेला.