Madhya Pradesh: भोपाळ मध्ये कोरोनावरील दोन्ही डोस घेतलेल्या एका 54 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, मध्य प्रदेशात एकाच आठवड्याच्या आतमध्ये ही दुसरी घटना घडली आहे. लसीकरण पूर्ण झाले असले तरीही कोविड19 मुळे मृत्यू होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.(COVID-19 Vaccination: दिवसभरात 46 लाखांहून अधिक लसीच्या डोससह भारताने पार केला 115.73 कोटींचा टप्पा)
भोपाळचे मुख्य सीएमएचओ डॉ. प्रभाकर तिवारी यांनी म्हटले की, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत संक्रमणाच्या कारणास्तव एका महिलेचा मृत्यू झाला. त्यांनी असे म्हटले की, महिलेने कोविड19 चे दोन्ही डोस घेतले होते. या संदर्भात एम्सच्या जनसंपर्क शाखेला फोन करत संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण काही उत्तर मिळाले नाही. मृत महिलेबद्दल भोपाळ मधील एका प्रसिद्ध डॉक्टरने म्हटले की, रुग्णाला 15 नोव्हेंबरला कोरोना व्हायरस झाल्याने एम्स, भोपाळ मध्ये दाखल करण्यात आले होते.
त्यांनी म्हटले की, महिलेचे वय 54 वर्ष होते आणि गुरुवार-शुक्रवारी रात्री जवळजवळ 12.30 वाजता एम्स भोपाळ मध्ये तिचा मृत्यू झाला. ती पूर्णपणे बरी होती आणि तिला कोणताही आजार नव्हता. फक्त तिला हलका रक्तदाबाची समस्या होती. मृत महिलेचा नवरा हा मध्य प्रदेशातील सरकारमध्ये डॉक्टर आहे.(COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 10,488 नवे कोरोना रूग्ण; 313 मृत्यू)
यापूर्वी रविवारी रात्री इंदौर येथे एका 69 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला. त्याने सुद्धा कोविड19 वरील लसीचे दोन्ही डोस घेतले होते. शुक्रवारी संध्याकाळ पर्यंत मध्य प्रदेशात 7,92,999 कोरोना संक्रमित मिळाले आहेत. यामधील आतापर्यंत 10,525 मृत्यू झाला आहे.