मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी (Madhya Pradesh Election 2023) भाजपाने आपली उमेदवारी यादी जाहीर केली. भाजपात (BJP) उमेदवारीवरून मोठी नाराजी असल्याचे चित्र आहे. पक्षाचे मध्य प्रदेश निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांना त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे.  केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेश निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांनाही भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. कार्यकर्ते विधानसभा मतदारसंघातून बाहेरच्या उमेदवाराला तिकीट दिल्याने संतप्त झाले. तसेच त्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या सशस्त्र जवानालादेखील धक्काबुक्की करण्यात आली.   (हेही वाचा - Mahadev App Betting Case: तब्बल 144 कोटी रुपये होते Saurabh Chandrakar च्या लग्नाचे बजेट, सेलिब्रेटींची केली दिशाभूल; ED च्या आरोपपत्रात समोर आली धक्कादायक माहिती)

पाहा व्हिडिओ -

भाजपच्या जबलपूरमधील विभागीय कार्यालयात कार्यकर्त्यांनी निवडणूक तिकीट वाटपावरून गोंधळ घातला गेला. शहराच्या उत्तर मध्य विधानसभा मतदारसंघातून बाहेरच्या उमेदवाराला तिकीट दिल्याने संतप्त झाले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष विष्णू शर्मा यांच्याविरोधात घोषणाबाजी आणि आक्षेपार्ह टिप्पणीही करण्यात आली. मात्र, नंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढणार असल्याचे सांगितले. यावेळी घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

आज भाजपने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आपली पाचवी यादी जाहीर केली. यामध्ये जबलपूरच्या उत्तर मध्य विधानसभा मतदारसंघातून अभिलाष पांडे यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर माजी मंत्री शरद जैन यांचे संतप्त समर्थक, आता पक्षात परतलेले माजी बंडखोर नेते धीरज पात्रिया आणि नगरसेवक कमलेश अग्रवाल यांनी भाजपच्या विभागीय बैठकीत जबरदस्तीने प्रवेश केल्याचे सांगण्यात येते.