मध्य प्रदेशात 'व्हेलेंटाईन डे'चे औचित्यसाधून तरुणाने तृतीयपंथीसोबत बांधली लग्नगाठ
मध्य प्रदेशात 'व्हेलेंटाईन डे'चे औचित्यसाधून तरुणाने तृतीयपंथीसोबत बांधली लग्नगाठ (फोटो सौजन्य-ANI)

'व्हेलेंटाईन डे'चे (Valentine Day)औचित्य साधून मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एका तरुणाने तृतीयपंथीसोबत लग्नगाठ बांधली आहे. तसेच इंदोर (Indore) येथील एका मंदिरात जाऊन लग्न केले आहे. या विवाहसाठी वधु-वर यांच्याकडील मित्रपरिवाराने उपस्थिती लावली होती.

जुनेद खान असे या वराचे नाव आहे. तर जया सिंग परमार असे वधुचे नाव आहे.तर जया ही तृतीयपंथी असूनही जुनेद याने तिच्याशी लग्न केले आहे. मात्र जुनेदच्या घरातील मंडळींना हे लग्न मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तरीही प्रेम आणि आयुष्यभर साथ देणाऱ्या जोडीदारासोबत मी कायम राहणार असल्याची भुमिका जनुदे खान याने व्यक्त केली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार जुनेद ह्याने असे सांगितले की, माझे जया हिच्यावर अत्यंत प्रेम असून मी तिच्यासोबतच राहणार आहे. तसेच आयुष्यभर आनंदात ठेवणार असल्याचे ही जुनेद यांने सांगितले आहे.

लग्नबंधनात अडकल्यानंतर दोघांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू पाहायला मिळाले. तसेच भावी आयुष्यासाठी एकमेकांना पदोपदी साथ देऊ अशा शपथा घेऊन संसाराला सुरुवात करणार असल्याचे या दोघांनी सांगितले आहे. तर लवकरच घरातील मंडळींही आमच्या दोघांच्या लग्नाचा स्विकार करतील अशी अपेक्षा जुनेद याने बाळगली आहे.