Maan Ki Baat: टोळधाडीमुळे नुकसान झालेल्या सर्वांना मदत मिळणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Narendra Modi On Locust Attack (Photo Credits: PTI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज मन की बात (Maan Ki Baat) या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला, यावेळी मोदींनी कोरोनासहितच (Coronavirus)  देशावर ओढवलेल्या अन्य ही संकटांविषयी भाष्य केले. एकीकडे देशाचा पूर्व भाग चक्रीवादळाचा (Cyclone) सामना करत आहे तर मध्य आणि पश्चिम भारतात आता टोळधाडीचे (Locust Attack) मोठे संकट पाहायला मिळत आहे असे मोदी म्हणाले. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) , राजस्थान (Rajasthan) आणि महाराष्ट्रात (Maharashtra) काही ठिकाणी मागील काही दिवसांपासून टोळ या कीटकांनी हल्ला केला आहे. हे अत्यंत छोटे कीटक सुद्धा मोठं संकट सिद्ध होत आहेत. मात्र या संकाटात नुकसान झालेल्या सर्वांना सरकारतर्फे आवश्यक ती मदत आणि नुकसान भरपाई देण्यात येईल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. Mann Ki Baat: भारताची लोकसंख्या जास्त असूनही कोरोना इतर देशांप्रमाणे पसरला नाही हे खरे भारतीयांचे यश- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये म्हण्टल्यानुसार, देशातील अनेक भागांमध्ये टोळधाडीमुळे परिणाम झाला आहे. टोळधाड बरेच दिवस सुरु राहते आणि त्याचा परिणाम मोठ्या भागावर होतो. या परिस्थितीतून हेच सिद्ध होते की अत्यंत छोटासा जीव सुद्धा अनेकांवर मोठं संकट आणू शकतो. मात्र हे संकट उलथवून लावण्यासाठी भारत सरकार असो, राज्य सरकार असो, किंवा स्थानिक प्रशासन असो सर्वच जण या संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी, शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी आधुनिक स्त्रोतांचा उपयोग करीत आहेत.  टोळधाड रोखण्यासाठी फटाके फोडा, ढोल वाजवा; गृहमंत्री अनिल देशमुख यांचा शेतकऱ्यांना सल्ला

PMO ट्विट

दरम्यान, हे कीटक दिवसाउजेडी शेतावर हल्ला करतात यामुळे पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते, हे कीटक मोठ्या आवाजाला घाबरत असल्याने टोळधाडी पासून वाचण्यासाठी देशात आता अनेक ठिकाणी घरभर येऊन जोरदार भांडी वाजवणे, फटाके फोडणे असे मार्ग अवलंबले जात आहेत.