एम चिन्नास्वामी स्टेडियम (Photo Credit: Getty)

RCB vs GT head-to-head record in IPL: आयपीएलच्या आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात टायटन्स (RCB vs GT) यांच्यात लढत होत आहे. हा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर (Chinnaswamy Stadium) गुजरात टायटन्ससोबत होत आहे. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना आहे. दोन्ही संघांनी विविध संघांसोबत प्रत्येकी 2 सामने खेळले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. त्यामध्ये दोन्ही सामन्यात बंगळुरूने विजय मिळवला आहे. याशिवाय, ते पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहेत. RCB vs GT IPL 2025 Live Streaming: गुजरात टायटन्ससमोर मजबूत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मोठे आव्हान; भारतात कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?

आयपीएलमध्ये एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचा परफॉर्मन्स

खेळलेले सामने: 91

सामने जिंकले: 43

सामने पराभूत: 43

दुसरीकडे, गुजरात टायटन्सनेही आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये एका सामन्यात विजय आणि दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत, आज ते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध जिंकण्याच्या इराद्याने ते एम. चिन्नास्वामी मैदानात उतरतील. शुभमन गिल गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत आहे. तर रजत पाटीदारच्या खांद्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या नेतृत्वाची जबाबदारी असेल. दोन्ही संघांकडे स्फोटक फलंदाज आहेत. अशा परिस्थितीत, एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?

आयपीएल 2025 चा 14 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज म्हणजेच 2 एप्रिल रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर पाहू शकता?

यांच्यातील आयपीएल 2025 चा 14 वा सामना स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येईल.

लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे उपलब्ध असेल?

लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल 2025 चा 14 वा सामना JioHotstar अॅपवर ऑनलाइन पाहता येईल.

चिन्नास्वामी स्टेडियम खेळपट्टी अहवाल

चिन्नास्वामी स्टेडियम हे फलंदाजांसाठी स्वर्ग मानले जाते. येथे तीनदा 260 पेक्षा जास्त धावसंख्या नोंदवण्यात आली आहे. येथे चाहत्यांना षटकार आणि चौकारांचा पाऊस पाहायला मिळतो. बेंगळुरूमधील हे स्टेडियम लहान आहे. त्यामुळे खूप जास्त चौकार मारले जाण्याची चान्सेस असतात. म्हणूनच बंगळुरूमध्ये अनेकदा उच्च धावसंख्या असलेले सामने होतात. म्हणूनच येथे गोलंदाजांना खूप अडचणी येतात. धावा वाचवणे त्याच्यासाठी खूप आव्हानात्मक आहे.

चिन्नास्वामी स्टेडियम रेकॉर्ड्स

बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आतापर्यंत एकूण 95 आयपीएल सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 41 वेळा विजय मिळवला आहे. तर पाठलाग करणाऱ्या संघाने 50 सामने जिंकले आहेत. बेंगळुरूच्या या मैदानावर सर्वाधिक धावसंख्या सनरायझर्स हैदराबादने केली. गेल्या हंगामात त्यांनी 287/3 धावा केल्या होत्या. जी लीगमधील आत्तापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर सर्वात कमी 82 धावा आरसीबी संघाने केल्या आहेत.

हवामान अहवाल

चाहत्यांना बेंगळुरूमध्ये संपूर्ण सामना पाहण्याची संधी मिळेल. दिवसाचे कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान 20 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान वेबसाइट AccuWeather च्या अहवालानुसार, संध्याकाळी उष्णता कमी होईल ज्यामुळे खेळाडूंना दिलासा मिळेल. दिवसभराच्या तीव्र उष्णतेनंतर रात्री हलक्या पावसाची शक्यता आहे. सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण असेल. एवढेच नाही तर वारे ताशी 33 किलोमीटर वेगाने वाहतील. संध्याकाळीही हलक्या पावसाची शक्यता आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ : रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, लियाम लिव्हिंगस्टोन, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाल, सुयश शर्मा, रसिक जॉब, बेंगलोर, बेंगळुरू, सुयश शर्मा, बेंगळुरू, बेंगलोर, बेंगलोर. स्वप्नील सिंग, अभिनंदन सिंग, रोमॅरियो शेफर्ड, लुंगी एनगिडी, नुवान तुषारा, मोहित राठी. स्वस्तिक चिकारा

गुजरात टायटन्स संघ : शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, शाहरुख खान, शेरफेन रदरफोर्ड, राहुल तेवतिया, रशीद खान, कागिसो रबाडा, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, इशांत शर्मा, वॉशिंग शर्मा, सनलीप, वॉशिंग, सन कृष्णा, ॲन फिलंड. महिपाल लोमरोर, अर्शद खान, जयंत यादव, निशांत सिंधू, कुलवंत खेजरोलिया, जेराल्ड कोएत्झी, मानव सुथार, कुमार कुशाग्रा, गुरनूर ब्रार, करीम जनात