संयुक्त अरब अमीरातचा (UAE) लुलू ग्रुप (Lulu Group) भारतात आपली गुंतवणूक वेगाने वाढवत आहे. लुलू ग्रुपने सोमवारी सांगितले की, ते पुढील तीन वर्षांत भारतात 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. लुलू ग्रुपने आतापर्यंत भारतात 20,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. लुलू ग्रुपचे अध्यक्ष एमए युसुफ अली म्हणाले की, भारतात 50,000 लोकांना रोजगार देण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या ग्रुपने आतापर्यंत 22,000 नोकऱ्या दिल्या आहेत. युसूफ म्हणाले की, त्यांचा समूह येत्या पाच वर्षांत तेलंगणामध्ये 3,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.
लुलू समूहाचे अध्यक्ष पुढे म्हणाले, त्यांना भारतातील मॉल्स, हॉटेल्स आणि अन्न प्रक्रिया युनिट्ससह विविध क्षेत्रांमध्ये 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. ग्रुपने एका शॉपिंग मॉलचे (अहमदाबादमधील लुलू मॉल) बांधकाम सुरू केले आहे. तसेच ग्रुप चेन्नईमध्ये आणखी एक शॉपिंग मॉल (चेन्नईतील लुलू मॉल) बांधत आहे. एक फूड प्रोसेसिंग प्लांट नोएडामध्ये आणि दुसरा तेलंगणात उभारला जात आहे. हा समूह पुढील 3 वर्षांत 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
लुलु ग्रुपने हैदराबादमध्ये शॉपिंग मॉलसाठी 2,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह पहिले लुलू मॉल आणि लुलू हायपरमार्केट स्थापन करण्याची योजना जाहीर केली होती. हैदराबादमधील आगामी लुलु मॉलमध्ये मेगा लुलू हायपरमार्केट असेल आणि त्यात 75 हून अधिक स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड असतील. साधारण 1,400 आसनक्षमता असलेला पाच स्क्रीन सिनेमा, एक बहु-पाककृती फूड कोर्ट आणि मुलांचे मनोरंजन केंद्र असेल.
अली म्हणाले की, हैदराबादमधील नवीन लुलू मॉल, पाच लाख स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आणि एकूण 300 कोटी रुपये खर्चून बांधला गेला आहे, त्याचे उद्घाटन ऑगस्ट 2023 मध्ये होणार आहे. याशिवाय, निर्यात-केंद्रित आधुनिक इंटिग्रेटेड मीट प्रोसेसिंग प्लांट आणि अत्याधुनिक डेस्टिनेशन मॉल उभारण्याचीही योजना आहे, जो 2.2 दशलक्ष स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला असेल. (हेही वाचा: आयात साठा येईपर्यंत तूर डाळीचा ऑनलाईन लिलाव, केंद्र सरकारचा निर्णय)
यासह अली म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदारीकृत एनआरआय गुंतवणूक नियम लागू केले आहेत. हे अनिवासी भारतीयांनी केलेल्या सर्व गुंतवणुकीला देशांतर्गत गुंतवणूक मानते.