
लखनौ (Lucknow) येथे बायकोने दारु पिण्यासाठी अडवले असता एका नवऱ्याने आत्मदहन केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली गेली आहे. हे प्रकरण मडियागाव क्षेत्रातील फैजुल्लागंड रुक्मिणी विहार येथील आहे. पोलीस मनोज कुमार यांच्या मते, मृतक कुलदीप पुत्र सुरज प्रसाद हा खासगी नोकरी करत होता. त्याला दारु पिण्याची सवय होती. शनिवारी त्याने दारु प्यायली होती. त्याचवेळी त्याने पुन्हा दारुसाठी बायकोकडे पैसे मागितले. मात्र बायकोने त्याला पैसे देण्यास नकार दिला. या दोघांमध्ये जोरदार भांडण सुद्धा झाले.
दरम्यान कुलदीप याने स्वत:ला खोलीत बंद केले आणि अंगावर तेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न करत आग लावली. खोलीतून आगीचे धूर आणि त्याचा आरडाओरड ऐकू आल्याने तातडीने घरातल्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याला उपचारासाठी रुग्णालयात सुद्धा दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.(Bihar: मॉलमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एका महिलेसह आरोपीला अटक)
याआधी बिहार मध्ये नवऱ्यासोबत भांडण झाले म्हणून बायकोने आपल्या 8 वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऐवढेच नाही तर महिलेने आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. सध्या महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. तर बायकोला नवऱ्याचे एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर सुरु असल्याचा संशय होता. त्यामुळे त्या दोघांमध्ये याच कारणावरुन भांडण झाले आणि तिने 8 वर्षीय मुलीला स्वत: सह बंद करुन मुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर महिलेने स्वत:ला सुद्धा गळफास लावण्याचा प्रयत्न केला.