विवेक तिवारी हत्या प्रकरण ; अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी मौन सोडले
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Photo Credits : IANS)

लखनऊ अॅपल मॅनेजरला पोलिसांनी गोळ्या घालून मारल्यानंतर त्याच्या पत्नीने कल्पना तिवारीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे दाद मागितली होती. त्याप्रकरणी योगी आदित्यनाथांनी हा एनकाऊंटर नसल्याचे सांगितले आहे. तसंच सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर गरज पडल्यास सीबीआय चौकशीही केली जाईल, असेही ते म्हणाले. अॅपल मॅनेजर विवेक तिवारीवर गोळी झाडणाऱ्या कॉन्स्टेबलला अटक

आयफोन एक्स प्लसच्या लॉन्चिंगनंतर सहकारी सना खानसोबत घरी परतत असताना ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही आरोपी कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी आणि संदीप यांना अटक केली आहे. त्याचबरोबर तिवारींच्या पत्नीने उत्तरप्रदेश सरकारकडे 1 कोटींची नुकसानभरपाई मागितली असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसंच पोलिस विभागात नोकरी देण्याचीही मागणी केली आहे.

कल्पना तिवारींनी पत्नीच्या हत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या म्हणतात की, पोलिसांनी माझ्या पतीला का मारले? ते कोणत्याही परिस्थिती असो पण त्यांच्यावर गोळी का झाडण्यात आली? त्याचबरोबर त्या म्हणाल्या की, जोपर्यंत माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत मी माझ्या पतीचे अंतिम संस्कार करणार नाही.