लखनौ येथे स्वयंपाकगृहात रोटी तयार करण्यासाठी पीठावर थुंकत असल्याचा किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद, पोलिसांकडून कारवाई
Arrest. Representational Image. (Photo Credit: ANI)

हेअर स्टाइलिस्ट जावेद हबीब (Jawed Habib) नंतर आता लखनौ येथील कारोरी परिसरात असलेल्या एका स्वयंपाकगृहातील किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या स्वयंपाकगृहात एक व्यक्ती रोटीच्या पिठावर थुंकत असल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. स्वयंपाक बनवणाऱ्यास त्याचे पाच सहकारी दानिश, हाफिज, मुख्यार, फिरोज आणि अनवर यांना अटक करण्यात आली आहे.(व्हायरल होत आहे RPF मध्ये कॉन्स्टेबल भरतीची खोटी जाहिरात; रेल्वे मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण)

व्हायरल झालेला व्हिडिओ हा 22 सेकंदाचा असून तो पाहिल्यानंतर लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. काकोरीचे सहाय्यक पोलीस आयुक्त आशुतोष कुमार यांनी असे म्हटले की, ढाब्याचा मालक याकूब याला अटक केली आहे. कुमार यांनी असे म्हटले की, आरोपींच्या विरोधात महारोगाच्या अधनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार आजार किंवा संक्रमणाचा फैलाव होण्याची शक्यता आहे.(Shocking! 2 महिन्यांच्या बाळाला उचलून घेऊन गेले माकड; पाण्याच्या टाकीत टाकले, मुलाचा मृत्यू)

पोलीस अधिकाऱ्यांनी खुलासा केला की, व्हिडिओ सुशील राजपूत नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियात अपलोड केला होता. व्हिडिओ दूरुन शूट केला आहे, त्यामुळे स्पष्ट कळून येत नाही की, तो खरच त्यावर थूंकत आहे की नाही. पोलिसांकडून आरोपाचा शोध घेण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. गेल्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात मेरठ येथे ब्रेडच्या पीठावर थुंकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नौशाद नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. पोलिसांनी असे सांगितले की, तो 10-15 वर्ष रोटी तयार करत होता आणि सुरुवाती पासूनच तो थुंक लावत होता.