भारतीय रेल्वेने कॉन्स्टेबल भरतीसाठी व्हायरल होत असलेल्या काही बातम्या या बनावट असल्याचे म्हटले आहे. काही अहवालांमध्ये दावा करण्यात आला होता की, काही वेबसाइट्सनी एक सूचना प्रकाशित केली आहे, ज्यामध्ये आरपीएफ कॉन्स्टेबल भर्ती 2022, परीक्षेद्वारे भरती केली जात असल्याचे सांगितले आहे. परंतु आरपीएफद्वारे अशी कोणतीही भरती सूचना प्रकाशित केलेली नाही. रेल्वेने म्हटले आहे की अशा वेबसाइट्सनी खोट्या बातम्या प्रकाशित केल्या आहे. भारतीय रेल्वेने अशी कोणतीही भरती जाहीर केलेली नाही. भारतीय रेल्वेने स्पष्ट केले आहे की, अशा कोणत्याही बनावट नोटिसांना बळी पडू नका.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)