लखनौ: हुंड्यात बाइक न दिल्याने नवऱ्याने तिहेरी तलाक देत कापले बायकोचे नाक
प्रतिकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

तिहेरी तलाक(Triple Talaq) विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर तो आता देशभरात लागू करण्यात आला आहे. मात्र तरीही गेल्या काही दिवसात तिहेरी तलाक दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर लखनौ (Lucknow) येथे एका नवऱ्याने बायकोला हुड्यांत बाइक दिल्याने तिहेरी तलाक दिल्याची बाब समोर आली आहे. एवढेच नाही तर नवऱ्याने बायकोचे नाक सुद्धा कापले असल्याचा प्रकार घडला आहे. जखमी झालेल्या पीडित महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बरकत नावाच्या व्यक्तीसोबत पीडित महिलेचा निकाह मुस्लिम पद्धतीने पार पडला. मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी बरकत याने तिला आपल्यासोबत घरी नेण्यास नकार दिला. मात्र महिलेने त्याच्या घरातील मंडळींना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता बरकत याने हुड्यांत बाइक न दिल्याने तलाक देत असल्याचे तिला सांगितले.(अहमदाबाद: नवऱ्याने तिहेरी तलाक दिल्याने बायकोने केला आत्महत्येचा प्रयत्न)

मात्र पीडित महिला बरकत याला भेटण्यासाठी गेली असता त्याने बायकोला पाहून संताप व्यक्त केला. त्याच रागाच्या भरात त्याने तिला मारहाण करत नाक कापले.तर काही दिवसांपूर्वी अहमदाबाद येथे सुद्धा नवऱ्याने तिहेरी तलाक दिल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.