तेल कंपन्यांनी घरगुती गॅस किंमतीत वाढ केली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमती तब्बल 25.50 रुपयांनी वाढल्या आहेत. हे नवे दर आज (1 जुलै) पासून लागू केले जाणार आहेत. दिल्ली (Delhi) आणि मुंबई (Mumbai) मध्ये 14 किलोच्या अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत 834.50 रुपये इतकी आहे. तर कोलकाता (Kolkata) मध्ये 835.50 रुपये असून चेन्नई (Chennai) मध्ये 850.50 रुपये इतकी आहे. (LPG Cylinder घेताना वितरक निवडण्याची ग्राहकांना मुभा; या '5' शहरांत सुरु होणार सुविधा)
त्याचबरोबर 19 किलोच्या व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीतही वाढ केली आहे. तब्बल 76 रुपयांची वाढ करण्यात आल्याने 19 किलोचा एलपीजी सिलिंडरचा भाव आता 1507 रुपये इतका झाला आहे. मे आणि जून महिन्यात या सिलिंडरचे भाव कमी करण्यात आले होते. वाढीव दरानुसार मुंबईत 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरचा भाव 1507 रुपये, दिल्लीत 1550 रुपये, कोलकाता मध्ये 1651.50 रुपये आणि चेन्नईत 1687.5 रुपये इतका झाला आहे.
एकीकडे पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांक गाठत असताना दुसरीकडे घरगुती गॅसचे दरही वाढले आहेत. संपूर्ण देशात एलपीजी गॅस सिलिंडरचे दर सारखेच आहेत. सरकार काही ठराविक ग्राहकांना यावर सबसिडी देतं. मात्र मेट्रो आणि प्रमुख शहरामध्ये सबसिडी काढून टाकल्यामुळे मागील दोन वर्षांपासून घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या आहेत.
एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत सर्वप्रथम 4 फेब्रुवारीला 25 रुपयांनी वाढ झाली होती. त्यानंतर 15 फेब्रुवारीला 50 रुपये, 25 फेब्रुवारीला 25 रुपये आणि 1 मार्च पुन्हा 25 रुपये वाढवण्यात आले होते. 1 एप्रिल रोजी सिलिंडरचा दर 125 रुपयांनी वाढवल्यानंतर राज्यातील तेल कंपन्यांनी प्रत्येक सिलिंडरमागे 10 रुपयांची सूट घोषित केली होती. दरम्यान, गॅस सिलिंडरच्या सातत्याने वाढणाऱ्या किंमतीचा बोझा नक्कीच सर्वसामान्यांवर पडत आहे.