शेअर बाजार (Photo Credits: PTI)

लोकसभा निवडणूक निकाल हाती येण्यास सुरूवात झाली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार सध्या सुरूवातीच्या कलनुसार एनडीए (NDA) आघाडीवर आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवर दिसत आहे. सुरूवातीचे कल पाहता शेअर बाजारात उत्सहाचं वातावरण पहायला मिळालं आहे. आज (23 मे) शेअर बाजार (Share Market) 600 अंकांनी अधिकने उघडला आहे. शेअर बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदा 40,000 च्या पार गेला आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून तेजीत असलेल्या शेअर मार्केटमध्ये आजही उत्साह कायम आहे. एका क्लिकवर पहा काय आहेत महाराष्ट्रसह भारत देशात काय आहेत निकाल?

ANI Tweet

यंदा 17 व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली. 11 एप्रिल ते 19 मे या काळात हे मतदान सात टप्प्यांमध्ये भारतामध्ये पार पडलं. तर महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यांमध्ये मतदान पार पडले. आज निवडणूक मतदानाची मतमोजणी सुरू आहे.