TV9-C Voter Exit Poll Results 2019 LIVE Streaming: टीव्ही 9 मराठी  आणि सी व्होटर चा एक्झिट पोल इथे पहा लाईव्ह, मतदारांचा कौल यंदा कुणाच्या पारड्यात पडणार?
Exit Polls Live (File Image)

Lok Sabha Elections Exit Polls and Predictions 2019: लोकसभा निवडणूक 2019 यंदा देशात सात आणि महाराष्ट्रात चार टप्प्यात पार पडली आहे. आज (19 मे) लोकसभा मतदानाचा सातवा आणि अंतिम टप्पा पार पडणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर हाती येणार्‍या एक्झिट पोलकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. एक्झिट पोल्स (Exit Polls) हे निवडणूकीचे अंतिम निकालाचं काय चित्र असेल? याचा अंदाज वर्तवतात त्यामुळे 23 मे रोजी जरी निकाल जाहीर होणार असेल तरीही आज संध्याकाळी एक्झिट पोल काय सांगतात? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. TV9 कडून जाहीर करण्यात येणार्‍या एक्झिट पोलकडे तुमचे लक्ष असेल तर तो लाईव्ह कसा आणि कुठे पहायचा ? हे जाणून नक्की घ्या. Lok Sabha Elections 2019 Aaj Tak Exit Poll LIVE STREAMING: 'आज तक' चा एक्झिट पोल लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून पहा मतदारांचा कौल कुणाच्या बाजुने?

TV 9 एक्झिट पोल लाईव्ह कुठे पहाल?

टीव्ही 9 मराठी आणि सी-व्होटर यांनी मिळून देशभरातील 542 लोकसभा मतदारसंघातील 4 हजारांपेक्षा जास्त विधानसभा क्षेत्रांमध्ये पाच लाखांहून अधिक मतदारांचा सर्व्हे केला आहे. टीव्ही 9 सोबतच देशामध्ये चाणक्य, इंडिया टुडे-अॅक्सिस, एबीपी-नेल्सन, इंडिया टीव्ही-CNX या संस्था, न्यूज चॅनल्स आपले अंदाज आज व्यक्त करणार आहेत. Exit Poll Results Of Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक 2019 च्या निकालाचे अंदाज वर्तवणार्‍या एक्झिट पोल कडे देशाचे लक्ष

नेदरलँडमध्ये समाजशास्त्र आणि माजी राजकीय नेते मार्सेल वॉन डॅम यांनी एक्झिट पोल या संकल्पनेला सुरूवात केली. 15 फेब्रुवारी 1967 रोजी पहिला एक्झिट पोल आला होता.