Lok Sabha Elections 2019: देशात लोकसभा निवडणुक होणार आहेत. तर राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभुमीवर आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी वायएसआर काँग्रेस ( YSR Congress) अध्यक्ष जगमोहन रेड्डी (Jaganmohan Reddy) यांच्यावरुन वादग्रस्त विधान केले आहे.
नायडू यांनी एका रॅलीचे आयोजन केले होते. त्यावेळी जनतेला संबोधित करताना नायडू यांनी, टजनमोहन हे तुळशीच्या बागेतील गांजाचे झाडट असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. तसेच प्रदेशातील समस्यांसाठी जगमोहन रेड्डी यांना नायडू यांनी दोषी ठरवत येत्या निवडणुकीसाठी विचार करुन त्यांना मत द्या असे जनतेला त्यांनी यावेळी आवाहन केले. त्याचसोबत रेड्डी हे गुन्हाचे ब्रँन्ड अँम्बासिटर असल्याचे ही म्हटले आहे. रेड्डी यांच्यावर 31 अपराधी गुन्हेसुद्धा दाखल असल्याचे नायडू यांनी स्पष्ट केले आहे.(हेही वाचा-आता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात)
तसेच जनतेला संबोधित करताना नायडू यांनी असे ही म्हटले की. जगमोहन यांनी त्यांचे काका विवेकानंद रेड्डी यांची हत्या केली अशा लोकांपासून सावधान राहा. तर आंध्र प्रदेशात लोकसभेसाठी 25 जागांसाठी मतदान 11 एप्रिल रोजी होणार आहे.