By Election 2021 Result: काँग्रेसला उभारी, भाजपला धक्का, प्रादेशिक पक्षांनाही चांगले यश; देशभरातील पोटनिवडणुकीचा निकाल, जाणून घ्या सविस्तर
Gram Panchayat Elections | (File Image)

देशभरातील 3 लोकसभा (Lok Sabha By-Election 2021) आणि 14 राज्यांतील 30 विधानसभा (Assembly By-Election 2021) पोटनिवडणुकांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी काल (2 नोव्हेंबर) पार पडली. या निवडणुकीत 30 पैकी 16 जागांवर एनडीए, 8 जागांवर काँग्रेस, 4 जागांवर तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) आणि इतर अन्य जागांवर इतर पक्षांनी विजय मिळवला. दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघात शिवसेना (Shiv Sena), हिमाचल प्रदेशातील मंडी येथे काँग्रेस (Congress) तर मध्य प्रदेशातील खंडवा जागेवर भाजप (BJP) विजयी झाला. पोटनिवडणुकीचा संपूर्ण निकाल घ्या जाणून.

विधानसभा पोटनिवडणुक निकाल (राज्यनिहाय)

असम विधानसभा- एकूण जागा 5

गोसाईगाव- यूपीपीएल (UPPL) (एनडीए)

भबानीपूर- भाजप

तामुलपूर- यूपीपीएल (UPPL) (एनडीए)

मारियाणी – भाजप

थोरा- भाजप

पश्चिम बंगाल (एकूण 4 जागा)

दिनहाटा- तृणमूल काँग्रेस

शांतीपूर- तृणमूल काँग्रेस

खर्डा- तृणमूल काँग्रेसच

गोसाबा- तृणमूल काँग्रेसच

मध्य प्रदेश (एकूण जागा 3)

पृथ्वीपूर- भाजप

जोबात- भाजप

रायगाव- काँग्रेस

हिमाचल प्रदेश (एकूण जागा 3)

फतेहपूर- काँग्रेस

जुब्बल-कोटखई- काँग्रेस

अर्की – काँग्रेस

मेघालय (एकूण जागा 3)

माव्रेंगकेंग- एनपीपी (NPP)

मावफ्लांग- यूडीपी (UDP)

राजबाला- एनपीपी (NPP)

बिहार- (एकूण जागा 2)

कुशेश्वरस्थान- जदयू (JDU)

तारापूर- जदयू (JDU)

कर्नाटक- (एकूण जागा 2)

सिंदगी विधानसभा- भाजप

हंगल विधानसभा – काँग्रेस

राजस्थान- (एकूण जागा 2)

वल्लभनगर- काँग्रेस

धारियावाड- काँग्रेस

महाराष्ट्र (एकूण जागा 1)

देगलूर विधानसभा मतदारसंघ- काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी

आंध्र प्रदेश- (एकूण जागा 1)

बडवेल- वायएसआरसी (YSRC)

हरियाणा (एकूण जागा 1)

एलेनाबाद- आयएनएलडी (INLD)

मिझोराम- (एकूण जागा 1)

तुइरिअल- मिझो नॅशनल फ्रंट (भाजपचा मित्रपक्ष )

तेलंगणा-(एकूण जागा 1)

हुजुराबाद- भाजप

(हेही वाचा, PM-CARES Fund: पीएम-केअर्स फंड हा भारत सरकारचा निधी नाही, तो RTI च्या कक्षेत आणला जाऊ शकत नाही- Central Government)

दादरा नगर हवेलीवर शिवसेनेचा भगवा

लोकसभा पोटनिवडणुकीत सर्वात लक्ष्यवेधी निकाल लागला तो दादरा आणि नगरहवेली येथे. या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या कलाबेन डेलकर विजयी झाल्या. कलाबेन डेलकर यांच्या विजयाच्या रुपात शिवसेनेने प्रथमच महाराष्ट्राबाहेर आपला झेंडा फडकवला आहे. शिवसेनेने या आधी महाराष्ट्राबाहेर विविध निवडणुका लढवल्या. मात्र, त्यात त्यांना यश आले नव्हते. दादरा व नगर हवेलीने मात्र शिवसेनेला यश मिळवून दिले.