Lal Krishna Advani Health Updates: लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती स्थिर; डॉक्टरांचे पथक लक्ष ठेऊन- सूत्र
Lal Krishna Advani | (Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com)

भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण आडवाणी (L.K. Advani Health Update) यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेऊन आहे, असे वृत्त वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. अविभाजित भारतात जन्मलेले 96 वर्षीय आडवाणी बुधवारी (3 जुलै 2024) नवी दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) मधून नुकताच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, पुन्हा एकदा प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लालकृष्ण आडवाणी यांच्या प्रकृतीबाबत पुढील अपडेट्सची प्रतीक्षा आहे. बुधवारी रात्री 9 च्या सुमारास अडवाणी यांना त्यांची मुलगी प्रतिभा अडवाणी यांच्यासोबत अपोलो रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अडवाणी हे न्यूरोलॉजी विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. विनित सुरी यांच्या देखरेखीखाली आहेत. वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. (हेही वाचा, Bharat Ratna: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान (VIDEO))

भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मान

अडवाणी यांनी 1998 ते 2004 पर्यंत गृहमंत्री आणि 2002 ते 2004 पर्यंत उपपंतप्रधान म्हणून काम केले. 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अडवाणींना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 31 मार्च 2024 रोजी प्रदान केला. राष्ट्रपती भवनाने त्यांची सात दशके राष्ट्रासाठी समर्पित सेवा अधोरेखित करून "भारतीय राजकारणातील एक नायक" म्हणून त्यांचे कौतुक केले. प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, "सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या त्यांच्या दृष्टीने, त्यांनी अनेक दशके, संपूर्ण देशामध्ये कठोर परिश्रम केले आणि सामाजिक-राजकीय परिदृश्यात परिवर्तन घडवून आणले."

जीवनप्रवास

अविभाज्य भारतात 8 नोव्हेंबर 1927 रोजी कराची येथे जन्मलेले अडवाणी 1942 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मध्ये सामील झाले आणि 1947 मध्ये फाळणीच्या वेळी भारतात स्थलांतरित झाले. त्यांनी 1960 मध्ये ऑर्गनायझर या आरएसएसच्या मुखपत्राचे सहाय्यक संपादक म्हणून काम केले. परंतु 1967 मध्ये पूर्ण त्यांनी राजकारात प्रवेश केला. सन 1986 मध्ये भाज पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) राम मंदिराच्या मागणीला पाठिंबा देण्याच्या दिशेने भाजपला चालना देण्यात अडवाणी महत्त्वपूर्ण होते.

त्यांनी 1986 ते 1990, पुन्हा 1993 ते 1998 आणि 2004 ते 2005 पर्यंत भाजपचे अध्यक्ष म्हणून नेतृत्व केले. 2013 मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना 2014 च्या भाजप निवडणूक प्रचाराचे प्रमुख म्हणून नियुक्त केल्यानंतर अडवाणींनी सर्व पक्षीय पदांचा राजीनामा दिला.