G20 Summit: G20 शिखर परिषद संमेलनात सहभाही होणाऱ्या आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या नेत्यांची संपूर्ण यादी
G20 Summit 2023 in Delhi (File Photo)

G20 summit 2023: नवी दिल्ली येथे येत्या रविवारी पार पडत असलेल्या G20 शिखर परिषदेला जगभरातील अनेक शक्तीशाली देशांचे प्रभावशाली नेते उपस्थित राहणार आहेत. यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (Joe Biden), ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक देशांच्या प्रमुखांचा आणि प्रतिनिधींचा समावेश असेल. या परिषदेत राष्ट्राराष्ट्रांमधील भू-राजकीय तणाव, आर्थिक मंदी आणि अन्न आणि ऊर्जेच्या वाढत्या किमती यांसोबतच संरक्षण, तंत्रज्ञान आणि मानवकेंद्री, पर्यावरणकेंद्री विकास यांबाबत चर्चा केली जाणार आहे. या परिषदेसाठी कोणकोणत्यादेशतील कोणकोणते नेते उपस्थि राहणार आहेत याची यादी पाहू शकता. ज्यामध्ये तुम्हाल देश आणि त्यांच्या नेत्यांनी नावे समजू शकतील.

जो बायडेन

युनायटेड स्टेस्टसचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीर केले आहे की, ते G20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी नवी दिल्ली येथे दाखल होणार आहेत. समाज, पर्यावरण आणि स्वच्छ ऊर्जा संक्रमण, हवामान बदलाविरुद्धचा लढा यांविषयी या परिषदेत चर्चा केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

ऋषी सुनक

खरेतर ऋषी सुनक हे भारताचे जावई आहेत. त्यांच्या पत्नी या इन्फोसीस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या कन्या आहेत. सुनक यांनीही जाहीर केले की, तेसुद्धा शिखर परिषदेसाठी दिल्ली येथे दाखल होणार आहेत.

फुमियो किशिदा

फुमियो किशिदा हे जपानचे पंतप्रधान आहेत. ते या परिषदेसाठी उपस्थित आहेत.

जस्टिन ट्रूडो

कॅनडाचे पंतप्रधान असलेले जस्टिन ट्रूडो हे सुद्धा परिषदेला उपस्थित राहणार आहेत. सध्या ते इंडोनेशियामध्ये आहेत. तेथूनच ते भारतात दाखल होणार असल्याचे समजते.

दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन हे उपस्थित राहणार आहेत.

दुसऱ्या बाजूला, चीनचे राष्ट्राद्यक्ष शी जिनपींग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव, स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझ, मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर असे काही देशांचे राष्ट्रप्रमुख जी ट्वेटी परिषदे उपस्थित राहणार नाहीत.