LIC IPO Listing Today: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या लाईफ इश्योरंन्स कार्पोरेशन ऑफ इंडियाने मोठा गाजावाजा करत आपला आयपीओ (LIC IPO) बाजारात आणला. या आयपीओने पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांना मोठा झटका दिला. आज म्हणजेच 17 मे रोजी बीएसई (BSE) आशा एनएसई (NSE) अशा दोन्ही ठिकाणी लिस्टींग झालेल्या आयपीओने बाजारात पदार्पणातच गुंतवणुकदारांची निराशा केली. कंपनीचा शेअर बीएसईवर 81.80 रुपये डिस्काउंट म्हणजेच 8.62% ने घसरुन तो प्रति शेयर 867.20 रुपयांवर लिस्ट झाला. तर हाच शेअर NSE वर 77 रुपये डिस्काउंटवर लिस्ट होऊन 8.11% घसरणीसर 872 रुपयांवर शेअर झाला.
लिस्टिंगच्या सुरुवातीला 10 मिनीटांनंतर 10.02 वाजता एलआसीच्या शेअर्समध्ये थोडीशी रिकरी पाहायला मिळाली. बीएसईवर कंपनीचा शेअर 4.36% घररुन तो 907.60 रुपयांवर ट्रेड करत आहे. (वृत्त लिहूपर्यंत काही आकडेवारी बदललेली पाहायला मिळू शकते.) दुसऱ्या बाजूला एनएसईवर हा शेअर 4.72% घसरणीसह 904.25 रुपयांवर ट्रेण्ड करतो आहे. (हेही वाचा, LIC PAN Card Link for IPO: एलआईसी आईपीओसाठी तुमच्या पॉलिसी खात्याशी अपडेट करा पॅन कार्ड! अन्यथा करावा लागेल पश्चाताप)
एलआयसी आयपीओ 9 मे रोजी बंद झाला होता आणि 12 मे रोजी बोली लावणारांना हे शेअर वितरीत करण्यात आले होते. सरकारने आयपीओच्या माध्यमातून एलआयसीचे 22.13 कोटीपेक्षा अधिक शेअर म्हणजेच 3.5% भागिदारी सादर केली आहे. त्याच्या किमतीची मर्यादा 902-949 रुपये प्रति शेअर ठेवली आहे.