Lesbian Marriage: काय सांगता? 24 वर्षीय विवाहित लेस्बियन महिलेने केले 16 वर्षांच्या पुतणीशी लग्न; वेश बदलून जगू लागल्या नवरा-बायको सारखे जीवन, पोलिसांकडून अटक
Lesbian Couple (Photo Credit: Pixabay)

Lesbian Marriage: मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये लेस्बियन लग्नाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका चुलतीने तिच्या अल्पवयीन पुतणीला फूस लावून पळवले. त्यानंतर तिच्याशी लग्न करून तिचे लैंगिक शोषण केले. आरोपी चुलतीचे इतर 10 महिलांशीही अवैध संबंध होते. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले आणि त्यानंतर तिची कारागृहात रवानगी केली.

जिल्हा मुख्यालयापासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या तांडा बरूर पोलीस स्टेशन परिसरात ही विचित्र घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी सांगितले की, या ठिकाणी एका 24 वर्षीय विवाहितेला तिच्या पुतणीशी लग्न आणि लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

अहवालानुसार, खांडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर भागातील महिलेचा विवाह वर्षभरापूर्वी उमरखळी येथील एका व्यक्तीशी झाला होता. यानंतर तिने आपल्या 16 वर्षीय पुतणीला आमिष दाखवून वासनेची शिकार बनवली. महिनाभरापूर्वी या दोघी गायब झाल्या. 27 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी महिला बेपत्ता झाल्याची आणि अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तपासात पोलिसांनी महिलेला धार जिल्ह्यातील पिथमपूर येथून अटक केली व अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये महिलेचे हे कृत्य समोर आल्यावर सर्वांनाच धक्का बसला.

माहितीनुसार लेस्बियन चुलातीने आपल्या अल्पवयीन पुतणीला कपडे घेऊन देण्याच्या बहाण्याने धामनोद आणि नंतर इंदूर येथील हॉटेलमध्ये नेले. तेथे आरोपी महिलेने तिच्याशी लग्न केले व पिडीत अल्पवयीन पुतणीचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर लेस्बियन काकी पुरुषाच्या वेषात राहू लागली. तिने आपले केस कापून घेतले. इतकेच नाही तर तिने तिच्या अल्पवयीन पुतणीला मंगळसूत्र घालायला भाग पाडले. या दोघी नवरा-बायकोसारखे जगत होत्या. सुमारे आठवडाभर हॉटेलमध्ये राहिल्यानंतर त्या धार येथील पिथमपूरला गेल्या. पोलिसांनी या ठिकाणाहून दोघींना ताब्यात घेतले. (हेही वाचा: Kolkata Lesbian Couple: कोलकाता येथील लेस्बियन जोडपे अडकले लग्नबंधनात; दोन तरुणींनी घेतल्या आयुष्यभरासाठी आणाभाका)

पोलीस स्टेशन प्रभारी यांनी सांगितले की, ही आरोपी महिला ओंकारेश्वर परिसरात चपलांचे दुकान चालवायची. तेथेही तिचे असे 8 ते 10 महिलांशी संबंध असल्याचे समोर आले. पिथमपूर येथील एका महिलेलाही तिने आपल्या जाळ्यात अडकवले होते, मात्र तिला असे संबंध ठेवायचे नव्हते. पोलिसांनी त्या महिलेचा जबाबही घेतला आहे. आता आरोपी महिलेवर कलम 377 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि तिला न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून तिची तुरुंगात रवानगी करण्यात आली.