देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) घोषणेकडे लागले आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज नागालँड (Nagaland), मेघालय (Meghalaya) आणि त्रिपुरा (Tripura ) विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly Election 2023) निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग आज (18 जानेवारी) दुपारी 2.30 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत घोषणा करण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात पार पडत असलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुका आहेत. आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध राजकीय पक्षांचे नेते आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे 16 सदस्यीय पथक शुक्रवारी नागालँडमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहे. नागालँडमध्ये 60 सदस्यीय विधानसभेचा कार्यकाळ येत्या 4 मार्च रोजी समाप्त होत आहे. तत्पूर्वी घटनात्मक तरतुदींनुसार नव्या सरकारसाठी निवडणूक होणे अपेक्षीत आहे. सध्या ख्यमंत्री नेफियु रिओ (Neiphiu Rio) यांच्या नेतृत्वाखालील सरकार नागालँडमध्ये कार्यरत आहे. (हेही वाचा, Remote Voting Option: स्थलांतरीत मतदारांसाठी दूरस्थ मतदानाची सोय- निवडणूक आयोगाचा नवी सेवा)
ट्विट
Election Commission of India (ECI) to announce the Schedule of General Elections to Legislative Assemblies of Nagaland, Meghalaya & Tripura today. pic.twitter.com/mzLYH43Wdg
— ANI (@ANI) January 18, 2023
दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी (14 जानेवारी) जोर देत म्हटले होते की, संविधानाने दिलेल्या आदेशानुसार ते नागालँडमध्ये 'निवडणूका घेण्यात येतील. कितीही आव्हाने आली तरी निवडणूक आयोगावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही'.