Hekani Jakhalu: हेखानी जाखलू यांनी नागालँड विधानसभेत विजय मिळवत मोठा इतिहास रचला आहे. हेखानी जाखलू या नागालँड विधानसभेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक पार्टी (NDPP) चे उमेदवार जाखलू यांनी त्यांचा जवळचा प्रतिस्पर्धी लोक जनशक्ती पार्टीच्या अजेतो जिमोमी यांचा दिमापूर-3 जागेवरून 1,536 मतांच्या फरकाने पराभव केला.
हेखानी जाखलू हे भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष असलेल्या एनडीपीपीचे उमेदवार आहेत. त्यांनी दिमापूर-3 मधून निवडणूक लढवली होती. नागालँडला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर तब्बल 60 वर्षांनंतर महिला आमदार मिळाल्या आहेत. हेकाणी जाखलू या व्यवसायाने वकील आहेत. (हेही वाचा - Nagaland Election 2023 Results: ... तर रिपब्लिकन पार्टी सत्तेमध्येही सहभागी होणार; पहा रामदास आठवले यांची नागालॅंड विधानसभा निवडणूक निकालानंतरची पहिली प्रतिक्रिया)
या विधानसभा निवडणुकीत 4 महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यापैकी हेखानी जाखलू विजयी झाल्या आहेत. निवडणुक रिंगणातील या चार महिला उमेदवारांमध्ये दिमापूर-3 जागेवरून राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) च्या हेखनी जाखलू, टेनिंग जागेवरून काँग्रेसच्या रोझी थॉम्पसन, पश्चिम अंगामी जागेवरून NDPP च्या सलहौतुओनुओ आणि अटोइजू जागेवरून भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) काहुली सेमा यांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, एनडीपीपीचे सल्हुतु क्रुसे पश्चिम अंगामी जागेवर तर भाजपचे हुकाली सेमा अटोइझू मतदारसंघातही आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे NDPP-भाजप युतीने 60 सदस्यीय नागालँड विधानसभेत 33 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे.
NDPP's Hekani Jakhalu becomes Nagaland's first woman MLA after she wins from Dimapur-III constituency
(Pic source: Hekani Jakhalu's Twitter Handle)#NagalandElections2023 pic.twitter.com/VbGavKLVch
— ANI (@ANI) March 2, 2023
ईशान्येत भाजपला मिळालेल्या भव्य यशाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना संबोधित करू शकतात. भाजपने त्रिपुरामध्ये स्वबळावर आणि नागालँडमध्ये त्यांचा वरिष्ठ मित्र राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) सोबत आघाडी करून सत्ता राखली.