नेते Sharad Pawar यांच्या निवासस्थानी पार पडली विरोधी पक्षांचे नेते आणि मान्यवरांची बैठक; जाणून घ्या नक्की काय होते प्रयोजन
Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) कॉंग्रेसला वगळून विरोधी पक्षांची मोर्चेबांधणी करत आहेत, अशा बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. आता आज नवी दिल्ली येथे शरद पवार यांच्या निवासस्थानी विविध विरोधी पक्षांचे नेते आणि अन्य मान्यवरांची बैठक पार पडली. ही राष्ट्र मंचची बैठक साधारण 2.5 तास चालली आणि अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, असे तृणमूल कॉंग्रेसचे नेते यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, ‘शरद पवार यांनी भाजप या विरोधी पक्षविरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्यासाठी राष्ट्र मंचची बैठक आयोजित केली होती, असे माध्यमांमध्ये वृत्त होते, मात्र हे पूर्णपणे चुकीचे आहे.’

ही बैठक पवार यांच्या निवासस्थानी झाली होती पण त्यांनी ही बैठक बोलविली नाही, असे राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ही बैठक राष्ट्र मंचचे प्रमुख यशवंत सिन्हा यांनी बोलविली होती आणि ती राष्ट्र मंचचे सर्व संस्थापक सदस्य आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने आयोजित केली होती. सध्या असे म्हटले जात आहे की शरद पवार कोणतेतरी मोठे राजकीय पाऊल उचलत आहेत आणि त्यामध्ये कॉंग्रेसवर बहिष्कार टाकला गेला आहे, मात्र हे पूर्णतः चुकीचे आहे.

माजिद मेमन यांनी सांगितले की, यात कोणताही राजकीय वगळलेला नाही. यामध्ये राष्ट्र मंचची विचारसरणी बाळगणाऱ्या नेत्यांना आम्ही आमंत्रित केले आहे, जिथे सर्व राजकीय पक्षांचे नेते येऊ शकतात. याठिकाणी कोणताही राजकीय भेदभाव नाही. मी वैयक्तिकरित्या कॉंग्रेस सदस्यांना आमंत्रित केले होते.' कॉंग्रेसचे नेते विवेक तंखा, मनीष तिवारी, कपिल सिब्बल, डॉ अभिषेक मनु सिंघवी आणि शत्रुघ्न सिन्हा यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी काहींनी त्यांच्या अडचणी व्यक्त केल्या. कॉंग्रेसला वगळून एक मोठा विरोधी गट उभा राहत असल्याची धारणा चुकीची आहे.

माजीद मेमन यांनी सांगितले की, आजच्या बैठकीत आम्ही देशातील राजकीय, आर्थिक, सामाजिक वातावरण सुधारण्यासाठी राष्ट्र मंच काय भूमिका घेऊ शकतो यावर चर्चा केली. सूचना ऐकल्या. यावेळी जावेद साहब आणि न्यायमूर्ती (निवृत्त) एपी शाह यांनीही आपले मत मांडले. ही काही राजकीय बैठक नव्हती. समाजवादी पक्षाच्या घनश्याम तिवारी यांनी सांगितले की, देशातील नागरिक आणि संघटनांशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक टीम तयार करण्यासाठी, राष्ट्र मंचने संयोजक असलेल्या यशवंत सिन्हा यांची नेमणूक केली आहे. (हेही वाचा: अयोध्येतील विकास कार्यासंबंधित 25 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार बैठक, नव्या मास्टर प्लॅनवर होणार चर्चा)

तेवारी यांनी पुढे सांगितले की, ‘राष्ट्र मंचामध्ये देशाच्या विकासासाठी आणि भविष्याचा विचार करणाऱ्या प्रत्येकाचा समावेश असेल, मग तो राजकीय पक्ष असो, सामाजिक संघटना असो किंवा एखादी व्यक्ती. आम्ही शेतकरी आणि मध्यमवर्गीय लोकांवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींचा काय परिणाम होत आहे यावर चर्चा केली. पुढील बैठकीत अधिकाधिक लोकांचा समावेश यावर लक्ष केंद्रित केले जाईल.’