पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 25 जून रोजी अध्योयेत सुरु असलेल्या विकास कार्यांवर मोठी बैठक करणार आहेत. या बैठकीत पीएम मोदी अयोध्येतील नव्या मास्टर प्लॅनवर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. ही बैठक व्हिडिओ कॉन्फ्रेंन्सिंगच्या माध्यमातून पार पडणार आहे. या बैठकीवेळी अयोध्येत होणारे विमानतळ उभारण्यासंदर्भात सुद्धा चर्चा केली जाणार आहे. असे सांगितले जात आहे की, बैठकीला उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अयोध्येतील विकास कामासंबंधित अधिकारी सुद्धा उपस्थितीत असणार आहेत.
पीएम मोदी यांना आतापर्यंत झालेल्या विकास कामांचा रिपोर्ट दिला जाणार आहे. ही बैठक गेल्या काही काळानंतर आता पार पडणार आहे. दरम्यान याआधी सुद्धा पीएम मोदी आणि योगींसह अधिकाऱ्यांसोबत बैठक केली होती.(International Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त पीएम मोदी यांच्याकडून M-Yoga App ची घोषणा, जनतेला दिला 'हा' सल्ला)
दरम्यान, बैठकीसंदर्भात स्थानिक प्रशासनाकडून जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागांना तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. बैठकीत पीएम मोदी राम मंदिर ते सरयुघाट सौंदर्यकरण आणि भगवान रामाच्या पुतळ्याच्या प्रोजेक्ट्सचा आढावा घेणार आहेत. अयोध्येत विकास कार्यांसाठी अयोध्या डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच ADA कडून 20 हजार कोटी रुपयांची विकास योजना तयार करण्यात आली आहे, अधिकाऱ्यांसह बैठकीत पीएम मोदी प्रत्येक योजनेच्या प्रगती रिपोर्टवर प्रश्न उत्तरे विचारणार आहेत.