नरेंद्र मोदी यांच्या 'सौगंध मुझे इस मिट्टी की ...' कवितेला लता मंगेशकर यांचा स्वरसाज; भारतीय जवान आणि जनेतला गाणं समर्पित (Watch Video)
Lata Mangeshkar | Image used for Representational purpose| Photo Credits: Facebook

Saugandh Mujhe Is Mitti Ki Song: भारताची गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी आज नरेंद्र मोदींच्या 'सौंगंध मुझे इस मिट्टी की .. ' या कवितेला स्वर साज चढवत एक खास व्हिडीओ ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला लता मंगेशकरांनी दिलेल्या माहितीनुसार, ' काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींचं (Narendra Modi) भाषण ऐकताना या ओळी कानावर आल्या. या कवितेमध्ये प्रत्येक भारतीयाच्या मनातील आजची भावना आहे. सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी मी हे गाणं समर्पित करते. ' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

लता मंगेशकर Tweet

नुकत्याच भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअर स्ट्राईक नंतर भारतीयांना याची माहिती देताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सौंगंध मुझे इस मिट्टी की .. ' या कवितेच्या काही ओळी त्यांनी म्हणून दाखवल्या. लता मंगेशकरांनी त्यांच्या आवाजात रेकॉर्ड केलेल्या नरेंद्र मोदींच्या ओळी ऐकून त्यांनीही लताजींचे आभार मानले आहेत.नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्येही 'सौंगंध मुझे इस मिट्टी की .. ' गाण्याचा समावेश करण्यात आला आहे.

नरेंद्र मोदी Tweet

मागील काही दिवसांपासून भारत - पाकिस्तानचे संबंध तणावग्रस्त बनले आहेत. आजही जम्मू काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण बनलेले आहे. सकाळी कारजवळ स्फोट त्यानंतर एसबीआय बँकेजवळ सीआरपीएफ जवानांवर ग्रेनेड हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.