इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे कृष्णमृती सुब्रह्मण्यम (Dr.KrishnamurthySubramanian) यांची देशाचे नवे आर्थिक सल्लागार (Economic Advisor) म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाल तीन वर्षांचा असणार आहे. तर अरविंद सुब्रह्मण्यम यांचा पदभार कृष्णमृती यांना सोपविण्यात आला आहे.
अरविंद सुब्रह्मण्यम (Arvind Subramanian) यांनी जुलै महिन्यामध्ये व्यक्तिगत कारणास्तव त्यांचा पदाचा राजीनामा दिला होता. नवे आर्थिक सल्लागार कृष्णमृती हे सध्या इंडियन स्कूल ऑफ बिझनेस येथे फायनान्स विभागाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच जगातील उच्च स्तरीय बँकींग, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि इकॉनॉमिर पॉलिसी तज्ज्ञांमध्ये त्यांची गणना केली जाते.
Dr. Krishnamurthy Subramanian appointed as the new Chief Economic Advisor (CEA) for three years. pic.twitter.com/3sLQ97gh8v
— ANI (@ANI) December 7, 2018
कृष्णमृती यांनी करिअरच्या सुरुवातीला न्यूयॉर्कमधील जेपी मॉर्गन या कंपनीत कन्सल्टंट म्हणून काम केले. त्यानंतर आयसीआयसीआयच्या एलाइट डिरेव्हेटिव्हज गटात व्यवस्थापक म्हणून पदभार सांभाळला होता.