पर्वतावर अडकला तरुण (Photo Credits-ANI)

Kerala: केरळ येथील पलक्कड मधील मलमपुझा परिसात तब्बल 43 तासांहून अधिक वेळ अडकलेल्या तरुणाला अखेर पहाडांवरुन सुखरुप खाली उतरण्यात सेनेच्या जवानांना यश आले आहे. रात्री उशिरा 34 जवान हे त्याला वाचवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. यापूर्वी तरुणापर्यंत पोहचण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले. परंतु ते सर्व विफल झाले. याच प्रकरणी जेव्हा मुख्यमंत्र पिनराई विजयन यांनी हस्तक्षेप केला तेव्हा बाबू नावाच्या या तरुणाला जवानांनी मदत केली. सेनेच्या जवानांनी आज पहाटेच्या 5.45 वाजता बचाव कार्य सुरु केले. तर त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी ड्रोन आणि सुलूर एअरबेस येथे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर जवान घटनास्थळी पोहचले. सेनेच्या 12 जवानांची टीम प्रथम रस्त्याच्या मार्गाने रात्री 1.30 वाजताच पोहचली. कारण रात्रीच्या वेळेस हेलिकॉप्टरच्या माध्यमातून प्रवास करणे शक्य नव्हते. तर पॅराशूट रेजिमेंटच्या 22 जवानांची दुसरी टीम एअरक्राफ्टच्या माध्यमातून पहाटे 4 वाजता पोहचली.(Arunachal Avalanche: अरुणाचल प्रदेशात लष्कराच्या 7 जवानांचे मृतदेह सापडले, हिमवादळानंतर करण्यात आले होते शोधकार्य)

Tweet:

स्थानिकांनी असे म्हटले की, बाबूने अन्य दोन जणांसोबत पर्वताच्या टोकावर चढण्याचा निर्णय घेतला. परंतु दोन जण अर्धवटच खाली उतरले. पण बाबू हा वरती चढतच होता. परंतु तेथून तो घसरला आणि तेथेच अडकला गेला.

बचाव दलातील एका सदस्याच्या मते, येथे सकाळी खुप गरम होते. तसेच संध्याकाळच्या वेळेस किंवा रात्री खुप थंड वारे वाहतात आणि येथे रानटी जनावरांचा धोका सुद्धा असल्याने रेक्स्यू कार्यात अडथळा येऊ शकतो असे त्याने म्हटले.

सदर घटना ही 2010 मध्ये झालेल्या एका सिनेमाप्रमाणे आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती पर्वतावर 127 तास अडकून राहतो. सिनेमा आणि या घटनेतील फरक ऐवढाच आहे की, त्यात व्यक्तीच्या बचावासाठी कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही कारण कोणालाच माहिती नव्हते तो कुठे आहे.