अल्पवयीन मुलींवर बलात्कार (Rape) लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या एका 42 वर्षीय व्यक्तीस तब्बल 133 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा (Kerala Man 133 Years Sentenced Jail ) ठोठावण्यात आली आहे. केरळ राज्यातील मलप्पुरम (Malappuram) येथील मंजेरी विशेष जलदगती पोक्सो कोर्टाने (Fast-Track Pocso Court) ही शिक्षा सुनावली. बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये कोर्टाने ही शिक्षा ठोठावली. दोषीने 11 आणि 13 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला होता. दरम्यान, दोषी व्यक्तीस दोन्ही प्रकरणातील शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत. धक्कादायक म्हणजे पीडिता सख्ख्या बहिणी आहेत आणि अत्याचार करणारा त्यांचा जन्मदाता बाप आहे. पोक्सो कोर्टाचे विशेष न्यायाधीश अश्रफ ए एम यांनी दिलेल्या निर्णयानुसार दोषीस शिक्षेसोबतच 8.8 लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. ज्याची रक्कम पीडितांना नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावी असे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाने या वेळी जिल्हा विधी सेवा प्राधीकरणास पीडित भरपाई सेवा कार्यक्रमांतर्गत पीडितांना नुकसानभरपाई देण्याचे आदेशही दिले.
पहिल्या प्रकरणात 123 वर्षांची शिक्षा
कोर्टाने आरोपीस पहिल्या प्रकरणात दोषी ठरविले. आरोपीने नोव्हेंबर 2021 ते मार्च 2022 या कालावधीत 13 वर्षांच्या मुलीवर त्याच्या घरी वारंवार बलात्कार केल्याच्या पहिल्या प्रकरणात 123 वर्षांचा तुरुंगवास आणि 7 लाख रुपयांचा दंड ठोठावला. भारतीय दंड संहिता कलम कलम 376 (3) आणि कलम 5 (l), पॉक्सो कायद्याच्या कलम 6 (1) (अग्रॅव्हेटेड पेनिट्रेटिव्ह लैंगिक अत्याचार) आणि 5 (n) अन्वये प्रत्येकी 40 वर्षांची शिक्षा ठोठावली. व्यतिरिक्त बाल न्याय कायदा 75 अन्वये आरोपीस तीन वर्षांचा सश्रम कारावासही ठोठावण्यात आला. (हेही वाचा, Shocking! पुण्यात अल्पवयीन मुलीवर भाऊ आणि वडिलांकडून 5 वर्षे बलात्कार; आजोबा व काकांनी केला विनयभंग)
दुसऱ्या प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा आणि 1.8 लाख रुपयांचा दंड
लैंगिक अत्याचाराच्या दुसऱ्या एका प्रकरणात आरोपीस दोषी ठरविण्यात आले आहे. ज्यामध्ये दोषीने 11 वर्षीय अल्पवयी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे कोर्टात सिद्ध झाले. या प्रकरणात त्याला 10 वर्षांची शिक्षा आणि 1.8 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ही घटना पीडितेच्या घरी 26 मार्च 2022 रोजी घडली. ही घटना तेव्हा पुढे आले जेव्हा आरोपीने पीडितेकडे लैंगिक सुखाची मागणी केली आणि पीडितेने याबाबत आपल्या आईला माहिती दिली. (हेही वाचा, जळगाव : अभ्यास करताना वडिल त्रास देतात म्हणून मुलाची पोलिसात धाव; पोलिसांनी दिला मदतीचा हात)
कुंपणाने खाल्ले शेत, बापच ठरला नराधम
पीडितेने दिलेली माहिती ऐकून आईच्या मनात शंका निर्माण झाली. तिने लहान पीडितेसोबतच तिच्या मोठ्या बहिणीचीही शारीरिक तपासणी केली. या वेळी पीडितेने सांगीतले की, आई घरात नसताना वडीलांनी अनेक वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. तसेच, घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केली तर लहान बहिणीवरही अशाच प्रकारे अत्याचार केले जातील, अशी धमकी वारंवार दिली गेली. मुलीने दिलेली माहिती ऐकून आईच्या पायाखालची जमीन सरकली. आपला पती म्हणजेच मुलीचे वडीलच अशा प्रकारे मुलींचे शोषण करत असल्याचे पाहून तिला धक्का बसला. (हेही वाचा, Madhya Pradesh: मुलीच्या प्रेमविवाहाला वडिलांचा विरोध, बलात्कार केल्यानंतर केली हत्या)
दोषीस किमान 43 वर्षांचा तुरुंगवास
पीडितेच्या आईने स्थानिक महिला पंचायत सदस्यास सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर प्रकरणाचा भांडाफोड झाला. या प्रकरणात चाइल्डलाइनने हस्तक्षेप करून मुलींचे जबाब नोंदवले. एडवण्णा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. निरीक्षक अब्दुल मजीद हे या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून काम पाहात होते. विशेष सरकारी वकील ए सोमसुंदरन यांनी सांगितले की, कोर्टाने कोठडीत खटला चालवण्याची सरकारी वकिलांची विनंती मान्य केली. “आरोपी गेल्या दीड वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत होता. त्याने अनेक वेळा जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आरोपीला जामीन दिला तर त्याच्या पत्नी आणि मुलीच्या जीविताला धोका आहे, हे आम्ही कोर्टाला पटवून दिले. आरोपीच्या जामीनास त्याच्या आईवडिलांचाही विरोध होता. वकिलांनी पुढे सांगितले की, दोषीला किमान 43 वर्षे तुरुंगात राहावे लागेल. त्याची रवानगी तवनूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.