ST Bus | (Photo Credit: MSRTC)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चिघळल्याने आज एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बस बंद करणाऱ्याचा निर्णय घेण्यात आला. अशातच आता कर्नाटक राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटी बंद केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सीमावादामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.(Karnataka: महाराष्ट्र-कर्नाटक वाद पेटला; कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावातील मराठी भाषेतील फलक काढले)

शुक्रवारी बेळगावात शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळतर यांच्या वाहनावर कानड्यांनी हल्ला केला. याच कारणामुळे कोल्हापुरात त्याचे पडसाद उमटले गेले आणि वाद पुन्हा एकदा चिघळला गेला. त्यावेळी कोल्हापूरात बस स्थानकात आंदोलन करत कर्नाटक राज्याची बससेवा बंद पाडली होती. त्याचसोबत जोरदार घोषणाबाजी करत शिवसेनेकडून कन्नड रक्षक वेदिके या संघटनेला चोख प्रतिउत्तर सुद्धा दिले होते.(Mamata Banerjee's Video: ममता बॅनर्जी यांचे समर्थकांना शांतता राखण्याचे अवाहन; रुग्णालयातून व्हिडिओ प्रसिद्ध केला)

Tweet:

दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीकडून कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात घडल्यानंतर उपस्थितांनी या व्यक्तीला चोप दिला. त्याला सध्या पोलिसांनी अटक केली असून महाराष्ट्रातून कर्नाटक येथे जाणारी बससेवा आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणारी बससेवा बंद केली आहे.

तर याप्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालमधील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावमध्ये सुरू असलेल्या खुनी हल्ल्यांवर गप्प का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसेच बेळगावात कानडींकडून मराठी माणसांवर खुनी हल्ले सुरू असून त्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.