कर्नाटकात (Karnataka) हिजाबबाबत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. येथे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेदरम्यान (Civil Services Exam) हिंदू विद्यार्थिनींना त्यांचे मंगळसूत्र (Mangalsutra) काढण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटकातील कलबुर्गी येथे सरकारी नोकरीच्या परीक्षेदरम्यान हिंदू विद्यार्थिनींचे मंगळसूत्र आणि कानातले काढून घेतल्याचा आरोप झाला आहे. मात्र बुरखा घातलेल्या मुलींना तपासणी करून आत प्रवेश दिला जात असल्याचा आरोप हिंदू विद्यार्थिनींनी केला आहे. भारतीय जनता पक्षाने या घटनेला हिंदूंविरुद्ध पक्षपाती असल्याचे म्हटले आहे. ही घटना रविवारी (5 नोव्हेंबर 2023) घडली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण प्री-ग्रॅज्युएशन गर्ल्स कॉलेज, कलबुर्गीशी संबंधित आहे. कर्नाटक लोकसेवा आयोगातर्फे रविवारी येथे एफडीए भरती परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेदरम्यान अनेक मुलींनी परीक्षेच्या नावाखाली त्यांचे मंगळसूत्र आणि गळ्यातील साखळी काढण्यात आल्याचा आरोप केला आहे. परीक्षेसाठी आलेल्या आणखी काही मुलींनीही सुरक्षा तपासणीच्या नावाखाली त्यांचे कानातले आणि पैंजण काढून टाकायला सांगितल्याची माहिती दिली.
ಹಿಂದುಗಳಿಗೆ ಮಾತ್ರವೇ? https://t.co/TjZ5yVTVw8
— Basanagouda R Patil (Yatnal) (@BasanagoudaBJP) November 5, 2023
आणखी एका विद्यार्थिनीने आरोप केला आहे की, काही मुली बुरखा घालून आल्या होत्या. त्या मुलींची तपासणी करण्यात आली मात्र त्यांना बुरख्यातच आत जाण्याची परवानगी देण्यात आली. या आदेशाला बळी पडलेल्या विद्यार्थिनींच्या म्हणण्यानुसार, मंगळसूत्र काढणे हे हिंदू परंपरेत अशुभ आहे, परंतु अधिकाऱ्यांमुळे त्यांना असे करावे लागले. त्यांच्या पायातील शूज काढण्यासाठीदेखील त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. काही विद्यार्थ्यांना ब्लूटूथ आणि इतर कॉपी साहित्यासह पकडल्यानंतर काटेकोरपणे तपासणी सुरु केल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. (हेही वाचा: Karnataka: कर्नाटकच्या शिवमोगा रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये दोन बेवारस बॉक्स सापडले, बॉम्ब शोधक पथकाला पाचारण - पाहा व्हिडिओ)
मात्र, तपासाच्या नावाखाली दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा आम्हाला का दिली जात आहे, असा जाब पीडित विद्यार्थिनींनी विचारला. ही बातमी काही वेळातच व्हायरल झाली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे विजयपुरा येथील आमदार बसना गौडा यांनी, हा नियम फक्त हिंदूंसाठी आहे का? अशी विचारणा केली. वाढता विरोध पाहून अनेक अधिकारी महाविद्यालयात पोहोचले. त्यानंतर तपासणीच्या नावाखाली महिलांचे मंगळसूत्र आदी काढू नये, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.