हुबळी धारवाड बायपास मार्गावर आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. मीनी बस आणि विरूद्ध बाजूने येणारा ट्रक एकमेकांना धडकला आहे. यामध्ये 11 जणांचा जीव गेला अअहे. दरम्यान हा अपघात बेळगावात धारवाड नजिक असणार्या Ittigatti मध्ये झाला आहे.
दावणगिरी येथून काही पर्यटक हे गोव्याला मिनी बसने जात होते. पहाटे धारवाड महामार्गावर मिनीबस आणि ट्रकची धडक झाली या भीषण अपघातामध्ये बसचा चुराडा झाला आहे. जखमींना नजिकच्या शासकीय रूग्णालयात घेऊन जात त्यांच्यावर उपछार सुरु झाले आहेत. 10 महिला आणि टेम्पोचा ड्रायव्हर यामध्ये मृत घोषित करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये काहींची स्थिती चिंताजनक आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर काही काळ हायवे वरील वाहतूक रेंगाळली होती. मात्र पोलिसांनी काही तासांतच नियंत्रणात आणली आहे. सध्या ट्राफिक क्लिअर करण्यात त्यांना यश आलं आहे.
Karnataka: Eleven people die in a collision between a minibus and a Tipper near Itigatti in Dharwad.
— ANI (@ANI) January 15, 2021
दरम्यान महामार्गावरील या रस्त्याचे रुंदीकरण व्हावं ही अनेक दिवसांपासूनची मागणी आहे.सध्या त्याचं काम सुरू असून 2023 पर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या देखील गाडीला भीषण अपघात झाला आहे. त्यामध्ये त्यांचा स्वीय सहाय्यक आणि पत्नीचा मृत्यू झाला आहे. सध्या श्रीपाद नाईक गोव्यात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.