कर्नाटक: कृषी कर्मण पुरस्कार वितरण सोहळ्यात महिलेच्या पायाशी झुकले पंतप्रधान नरेंद्र मोदी; 'हे' होते कारण
PM Narendra Modi At Krushi Karman Award (Photo Credits: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी, 2 जानेवारी रोजी कर्नाटक (karnatak) मधील तुमकूर (Tumkur) येथे एका सभेला संबोधित केल्यानंतर शेतकऱ्यांना कृषी कर्मण पुरस्काराचे वितरण केले. याच वेळी एक वेगळी आणि लक्षवेधी घटना घडली. पुरस्कार विजेत्या महिलेला जेव्हा मोदींनी सन्मानिका दिली तेव्हा ही महिला नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली झुकली मात्र मोदींनी तिला अडवून स्वत:तिच्या पायावर झुकून नमस्कार केला. अवघ्या काही क्षणातच घडलेल्या या अनपेक्षित घटनेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलेच तर, हा क्षण कॅमेऱ्यात कॅप्चर झाल्याने काहीच वेळात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देखील हा व्हिडिओ ट्विट केला आहे. Savitribai Phule jayanti 2020: सावित्रीबाई फुले यांच्या 188 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले विनम्र अभिवादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर असताना काल तुमकूर येथेही कृषी कर्मण आणि किसान क्रेडिट कार्ड वितरण समारंभ झाला. या सोहळ्यात कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या देशभरातील अनेक लोकांचा सत्कार करण्यात आला. याच पुरस्कार सोहळ्यातील हा क्षण ट्विट करताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी "प्रत्येक आईचा प्रत्येक मुलीचा सन्मान ठेवणे हे आमचे ध्येय आहे आणि  मोदी जे बोलतात ते आचरणात उतरवतात, हे  या व्हिडिओतुन दिसून येते असे म्हंटले आहे.

पहा हा व्हिडीओ

दरम्यान, आज, 3 जानेवारी रोजी मोदी हे भारतीय विज्ञान काँग्रेस मध्ये सभेला संबोधित करत आहेत. यावेळी त्यांनी देशाची विज्ञान क्षेत्रात होत असणारी वाढ कौतुकास्पद आहे असे म्हणत आपल्या सरकारने आणलेल्या स्वच्छ भारत, आयुष्यमान भारत या मोहीम देखील विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बळावर जगभरात यशस्वी होत आहेत असेही सांगितले आहे.