Savitribai Phule and Narendra Modi (Photo Credits: PTI and Insta)

Savitribai Phule 188th Birth Anniversary: ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते ; स्त्रीला शिक्षणापासून आणि स्वावलंबी राहण्यापासून दूर ठेवले जात होते त्या काळात सावित्रीबाई फुले (SavitriBai Phule) यांनी समाजाचा रोष पत्करुन आपल्या पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साथीने आपले शिक्षण पूर्ण केले आणि अन्य महिलांनाही शिकवले. त्यांच्या या अद्भूत आणि खडतर संघर्षामुळे आजच्या काळातील स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात स्वत:चे स्थान बनवले आहे. याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते. अशा या क्रांतिज्योती आणि भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या 188 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन त्यांना विनम्र अभिवादन केले आहे.

आज देशभरात सावित्रीबाई यांची जयंती साजरी केली जाईल. या दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष ट्विट केले आहे.

हेदेखील वाचा- Savitribai Phule Jayanti 2020: भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचे विविध पैलू मांडणारे '10' अनमोल गोष्टी

यात त्यांनी म्हटले आहे की, सावित्रीबाईंनी सामाजिक एकता, शिक्षण आणि महिला सशक्तीकरण यांच्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. त्यांचा शिक्षणाबाबतचा संघर्ष कायम सर्वांच्या स्मरणत राहील असा आहे.

फुले दाम्पत्याने जो यशवंतराव नावाचा मुलगा दत्तक घेतला होता तो एका विधवा ब्राह्मण महिलेचा होता. त्यांनी आपल्या मुलासोबत एक रुग्णालय सुरु केले होते. याच रुग्णालयात पुढे सावित्रीबाई फुले प्लेग आणि महामारी यांसारख्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची सेवा करत. प्लेग आजाराची लागण झालेल्या एका रुग्णाची सेवा करत असताना सावित्रीबाई यांनाही या आजाराचा संसर्ग झाला. या संसर्गाचे आजारात रुपांतर होऊन सावित्रीबाई फुले यांचे 10 मार्च 1897 या दिवशी निधन झाले.