Electric Bus Accident (Photo Credits-ANI)

Kanpur: कानपूर येथे काल रात्री टाटामिल चौथऱ्या जवळ एका इलेक्ट्रिक बसवरील ताबा सुटल्याने 17 वाहनांना धडक दिल्याची दुर्घटना घडली. यामध्ये 6 जणांना घटनास्थळी मृत्यू झाला आहे. तर बहुतांश लोक हे गंभीर झाले आहेत. जखमींपैकी 7 जणांना टाटामिल येथील कृष्णा रुग्णालयात आणि चार जणांना हॅलेट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. तर दुर्घटनेनंतर काही जणांनी घटनास्थळापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. इलेक्ट्रिक बस टाटामिल चौथऱ्याजवळ एका डंबरला ती धडकली. दरम्यान, बस चालकाने स्वत:चा जीव यामध्ये वाचवला.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 11.30 वाजता ही बस वेगाने घंटाघर येथून टाटामिल येथे जात होती. पुलावरुन उतल्यानंतर बस उलट दिशेने जाऊ लागली आणि त्यामध्ये येणाऱ्या सर्व वाहनांना तिने धडक दिली.(Bihar: वडिलांनी दाखल केली अपहरणाची FIR, मुलीने फेसबुकवर Got Married म्हणत केली पोस्ट)

Tweet:

आरएम डीवी सिंह यांचे असे म्हणणे आहे की, ई बसचा क्रमांक युपी 78 जीटी 3970 असा असून तिचा अपघात झाला. ई-बसचे संचालन आणि मेन्टेनन्सचे काम खासगी कंपनी पीएमआयचा आहे. त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. याप्रकरणी संपूर्ण तपास केल्यानंतर कारवाई केली जाईल.