Nakul Kamal Nath To Join BJP: कमलनाथ मुलगा नकुलसह भाजपच्या वाटेवर? राहुल गांधी यांच्या यात्रेदरम्यान मध्य प्रदेश काँग्रेसला धक्का?
Kamal Nath | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातूनही काँग्रेस (Congress) पक्षासाठी धक्कादायक वृत्त येत आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ (Kamal Nath) भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. मात्र, त्यांचा मुलगा नुकुल (Nakul) यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यांवरुन काँग्रेस पक्षाचे नाव हटवले आहे. त्यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळू लागले आहे. दुसऱ्या बाजूला कमलनाथ हे सुद्धा दिल्लीला रवाना झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. राहुल गांधी यांची भात जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) मध्य प्रदेश राज्यात लवकरच प्रवेशकरत आहे. तत्पूर्वी एमपीच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या घामोडी पाहायला मिळू शकतात.

छिंदवाडा दौरा रद्द

कमलनाथ हे आज छिंदवाडा दौऱ्यावर होते. मात्र, अचानक त्यांनी आपला छिंदवाडा दौरा रद्द केला आहे. आज दुपारी ते दिल्लीसाठी रवाना होत असल्याचे वृत्त आहे. छिंदवाडा जिल्ह्याचा पाच दिवसांचा दौरा रद्द करुन कमलनाथ अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे उलट-सुलट चर्चांना उधान आले आहे. त्यासोबतच मध्यप्रदेशमध्ये राजकीय हालचालींनाही मोठा वेग आला आहे. राजकीय वर्तुळामध्ये अटकळ व्यक्त केली जात आहे. त्यानुसार कमलनाथ हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करु शकतात. भाजप प्रवक्ते नरेंद्र सलूजा यांनी कमलनाथ आणि नकुल नाथ यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यांच्या एक्स हँडलवर या पितापुत्राचा फोटो सामायिक करत त्यांनी 'जय श्री राम' म्हटले आहे. ज्याचा राजकीय अर्थ काढला जात आहे. (हेही वाचा, Kamal Nath On BJP: भाजपचे मनी आणि मसल पॉवरचे राजकारण सुरु: कमलनाथ)

कमलनाथ यांच्याविषयीच्या चर्चा केवळ मीडियातील ब्रेकींग न्यूज

कमलनाथ यांच्यविषयी सुरु असलेल्या चर्चांवर काँग्रेस पक्षातून प्रतिक्रिया आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्वीजय सिंह यांनी म्हटले आहे की, कमलनाथ यांच्या भाजपमध्ये जाण्याची चर्चा केवळ प्रसारमाध्यमांनी दिलेली ब्रेकींग न्यूज आहे. कमलाथ यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात गांधी परिवारासोबतच केली आहे. ते काँग्रेस पक्षासोबत भक्कमपणे उभा राहणारे नेते आहेत. गांधी कुटुंबासोब कमलनाथ यांचे अतूट नाते आहे. जनसंघाची सत्ता असताना इंदिरा गांधी यांना तुरुंगात टाकण्याच्या हालचाली सुरु होत्या. तेव्हाही कमलनाथ काँग्रेस पक्षासोबत भक्कमपणे उभा राहिले होते. त्यामुळे आताही ते तसेच उभा राहतील असा विश्वास दिग्वीजय सिंह यांनी व्यक्त केला आहे.

एक्स पोस्ट

कमलनाथ नाराज?

दरम्यान, 'द न्यू इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा नकुल नाथ हे राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रा' भाजपशासित राज्यात प्रवेश करण्यापूर्वी पक्षांतर करु शकतात. काँग्रेसने ग्वाल्हेर-चंबळ येथील नेते अशोक सिंग यांना राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. ही उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी पक्ष नेतृत्वाने सल्लामसलत न केल्यामुळे कमलनाथ नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हीडी शर्मा यांनी यापूर्वी सांगितले होते की, राम मंदिराच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्याचे निमंत्रण नाकारल्याने अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेते त्यांच्या पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत.